राळेगण सिद्धी: अण्णा हजारे यांच्याकडून देश बचाव जनआंदोलन समितीला चर्चेला येण्याची निमंत्रण देण्यात आलं होतं. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राळेगणसिद्धीत येऊन हजारे यांची भेट घेतली. दुसरीकडे आता कोठे गेले अण्णा, झोपले की काय? असा सवाल वारंवार सोशल मीडियातून केला जातो. या वरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना ट्रोल ही केलं जात. मात्र आता अण्णा हजारे यांनी जनतेवरच कुंभकर्णासारखं झोपाल्याचा आरोप केला आहे. ‘जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत,’ आपण मात्र जागे आहोत असे म्हणाले.
देश बचाव जनआंदोलन समितीनं गेल्या आठवड्यात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी अश्या विविध प्रश्नांवर हजारे यांनी भूमिका मांडावी, जनव्यापी आंदोलनासाठी अण्णा हजारे यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी केली होती. नाहीतर अण्णा हजारेंच्या गावी आंदोलन केले जाईल असा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर त्यांनी समितीला चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी बोलताना ते म्हणाले की, ‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळे हे मोदी सरकार मागणी नसताना बहुमताच्या जोरावर नको कायदे पारित करत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे.
देश बचाव जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी हजारे यांना पूर्वीच्या आंदोलनांची आठवण करून दिली. त्यावर अण्णा हजारे म्हणाले ‘शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही देशव्यापी संघटन उभं करा. मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गानं जात आहात. तेव्हा मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल.