वडगाव: वडगाव बुद्रुक प्रयेजा सिटी येथील लिंगायत स्मशानभूमीत अज्ञातांनी राडरोडा टाकला असून व लिंगायत स्मशानभूमी चे गेट सुद्धा तोडले आहे. शहरात एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबविले जात असून दुसरीकडे मोकळ्या जागेमध्ये राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.
हे पण वाचा, देश भरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो फोटो खडकवासल्यातला
या बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे खडकवासला मतदार संघाचे कार्याध्यक्ष शरद दबडे पाटील यांनी अश्या समाज समाजकंटकांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सहाय्यक आयुक्त जयश्री काटकर मॅडम (सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय) यांच्याकडे निवेदन दिले आहे. ज्यांनी या समशानभूमीच्या परिसरात राडारोडा तसेच लिंगायत स्मशानभूमी चे गेट तोडले आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
हे पण वाचा,
महेश पोकळे यांच्या पाठपुराव्याला यश; अपघाताला निमंत्रण देणारे रस्ता दुभाजक हटवले
जांभूळवाडी तलावाच्या काठावर मेलेल्या हजारो माशांचा खच
दरवर्षी मुसळधार पावसाने पाण्याखाली जाणारा भिडे पूल, यावर्षी मात्र जलपर्णीखाली
न्यायालयाची बंदी झुगारून कात्रजजवळ गुजरवाडी येथे बैलगाडा शर्यत