बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341
सुखदुःखाच्या काळात आपल्या हक्काचे डॉ. अजितसिंह हे आहेत - खासदार सुप्रिया सुळे यांचे गौरवाद्गार
धायरी: सिंहगड रोड भागामध्ये धायरी येथे मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह डायलेसिस युनिटचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्या अनुषंगाने सिंहगड रोड भागामध्ये धायरी येथे मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये लवकरच शासकीय आरोग्य योजनांमार्फत मोफत उपचार केले जाणार आहेत.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वडगाव बु. (खडकवासला विधानसभा मतदारसंघ) येथील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, सिंहगड रोड येथे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना तसेच डायलेसिस युनिट चा शुभारंभ करण्यात आला. pic.twitter.com/BTUit014nf
— Supriya Sule (@supriya_sule) August 23, 2021
या वेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितसिंह पाटील यांचे कौतुक करत त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचाही उल्लेख केला. सुखदुःखाच्या काळात आपल्या हक्काचे डॉ. अजितसिंह हे आहेत असे गौरवाद्गार ही त्यांनी काढले तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याही कार्याचा उल्लेख करत कार्याचाही वेळी त्यांनी गौरव केला. राजेश टोपे यांनी करोना काळात जे राज्याचे नेतृत्व केले ते कौतुकास्पद आहे असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. दीड वर्षाच्या कठीण अश्या कोरोना महामारीच्या काळामध्ये आरोग्यसेवा, औषधे, लसीकरण महाविकास आघाडी सरकारने गावा-गावातील वाड्यावस्त्यापर्यंत पोहचवले आहे. अजित दादांच्याही कार्याचा या वेळी त्यांनी उल्लेख केला. त्या बाबत बोलताना त्यांनी सांगितले की अजित दादा दार शुक्रवारी पुण्यामध्ये कोविड आढावा बैठक घेतात. अशी बरीच माणसे असतात त्यांना हॉस्पिटलची बिले परवड नाहीत अशांना जी काही मदत लागेल ती करावी असे आवाहन मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला केलं.
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी आपल्यला माहिती नसते त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता घेता येणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या योजने अंतर्गत समाजातील गरजू , कष्टकरी, आर्थिक दुर्लब घटकासाठी मोफत सेवा देण्याचा आमचा मानस आहे. तसेच जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही हॉस्पिटलचे संचालक अजितसिंह पाटील यांनी केले.
गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये घेता येणार आहे. उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. या वेळी सुरेश गुजर यांनी मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला अँब्युलन्स भेट दिली.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुरेशअण्णा गुजर, गूरूवर्य कुमार दादा, त्रंबक मोकाशी, काका चव्हाण, पुणे मनपा नगरसेविका सायली वांजळे, पुणे मनपा नगरसेवक सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, मेजर गजानन पाटील, डॉ. मोनाली पाटील, डॉ.सुनिल जगताप, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी व मेडिकल टीम उपस्थित होते.