'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन'निर्मित '143' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस

 

Poster-of-143-produced-by-Sharda-Films-Production



दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित प्रेमाची आगळीवेगळी लव्हेबल केमिस्ट्री लवकरच '143' चित्रपटातून प्रेक्षकांकरिता सज्ज

दोन दिवसापासून 'हे आपलं काळीज हाय' या टॅगलाईनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर तर जनतेने या 'हे आपलं काळीज हाय' टॅगलाईनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यांचे काळीज कोण आहे याचा देखील उलगडा कमेंट बॉक्स मध्ये केला आहे. 'हे आपलं काळीज हाय' ही टॅगलाईन '143' चित्रपटाची असून चित्रपटात कोण कोणाचे काळीज आहे हे 'शारदा फिल्म्स प्रॉडक्शन' तर्फे आणि  विरकुमार शहा निर्मित '143'(हे आपलं काळीज हाय) या प्रेममय भावना व्यक्त करणाऱ्या चित्रपटातून लवकरच उलगडणार आहे. नुकतेच या नवीन चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दाक्षिणात्य पद्धतीने केले असून मराठी चित्रपटांमध्ये वेगळेपण दर्शविणारा हा सिनेमा असणार आहे.


दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपटाचे पोस्टर हे प्रेमबद्ध कथेला बांधून ठेवणारे आहे हे पोस्टर पाहताच लक्षात येते. मात्र पोस्टरवरून नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत याचा उलगडा केला नसल्याने चित्रपटात नेमके कोणते कलाकार झळकणार याकडे सिनेरसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दिग्दर्शक योगेश भोसले यांनी आगळ्यावगेळ्या दाक्षिणात्य पद्धतीने चित्रित केलेल्या या चित्रपटात कोणत्या कलाकारांना संधी दिली असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. 



कोरोनाच्या काळात चित्रपटगृहांनाही पूर्णविराम मिळाला असून रसिक प्रेक्षकांच्या नजरा मनोरंजनाकरिता चित्रपटगृहाकडे वळल्या आहेत यातच प्रेमाचे लव्हेबल फंडे घेऊन चित्रपटगृह सुरू होताच '143'(हे आपलं काळीज हाय) ​हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर केव्हा येईल याकडे साऱ्या सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या २२ ऑगस्टला खऱ्या प्रेमाची व्याख्या सांगणाऱ्या या '143' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यामुळे साऱ्या सिनेप्रेमींच्या नजरा चित्रपटाकडे वळल्या आहेत.

हे पण वाचा, 

मंदार काणे आणि समीर पौलस्ते निर्मित 'चित्र मराठी' हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांच्या भेटीस

‘अवांछित’ मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर पडणार
'उसासून आलंय मन'चं पोस्टर रिलीज 
कोरोना काळात "लॉ ऑफ लव्ह" च्या फर्स्ट लूक चे डिजिटली अनावरण




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.