पुणे: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांकडून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यंदाही पुणेकरांना सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर निर्बंधांचे सावट आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने कराव. तसेच गणेश मंडळांनी आरोग्य सेतु अॅप वापरण्यास प्राधान्य देऊन सामाजिक उपक्रम राबविताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे.
पोलिसांनी आचारसंहितेत नमूद केल्याप्रमाणे गणेशमूर्ती खरेदी, प्रतिष्ठापना, दर्शन, आणि विसर्जनबाबत मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच श्रीं’च्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीला मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी विविध उपक्रम, शिबीरे आयोजित करण्याचे आवाहननागरिकांना बाप्पांच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहेत.आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आचारसंहीता तयार केली आहे. या आचारसंहीतेचे पालन करण्याचेही नागरीकांना आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.
अशी असणार पुण्यातील गणेशोत्सवासाठी नियमावली
सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फूट राहणार
घरगुती गणेशमूर्ती २ फूट उंचीची असावी
मुर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी
मोकळ्या जागांवर मुर्ती विक्रीची व्यवस्था- श्रींच्या आगमन व विसर्जनासाठी मिरवणूक काढू नये
श्रींचे आगमन आणि विसर्जनासाठी कमीत कमी लोकं एकत्रीत येतील
मंदिरे असलेल्या मंडळांनी श्रींचे मंदिरातच प्रतिष्ठापना करावी
मंदिरे नसणाऱ्यांसाठी महापालिकेच्या नियमानुसार छोट्या मंडपास परवानगी
आरती व पुजेसाठी 5 व्यक्ती हजर राहतील
गर्दी होईल, असे उपक्रम टाळावेत
श्रींच्या दर्शनाची व्यवस्था ऑनलाईन करावी
नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी
सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी आरोग्य उपक्रम राबवावे
संरक्षणासाठी पाच कार्यकर्ते किंवा खासगी सुरक्षा रक्षक २४ तास ठेवावेत
आरोग्य सेतु ऍप वापरणे बंधनकारक
सामाजिक अंतर राखणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा बंधनकारक
विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही
८४ नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती
विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल
सार्वजनिक घाट, नदी, नाल्यावर विसर्जनास मनाई
घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करावे