पुणे शहर कॉंग्रेसची सूत्रे पुन्हा रमेश बागवे यांच्याकडेच

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या पुणे शहर अध्यक्षपदी रमेश बागवे यांची फेरनिवड


पुणे: सहा महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पाटोलेंकडे आल्यानंतर शहर काँग्रेसमध्येही पदाधिकारी बदलाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. शहर काँग्रेसमध्ये फेरबदल होणार, अशी चर्चा गेले कित्येक महिने सुरू होती. मात्र, प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येत होती. मात्र यात रमेश बागवे यांच्यावरचा विश्वास पक्षाने कायम राखत पुणे शहर अध्यक्षपदी रमेश बागवे यांची फेरनिवड केली आहे.

 


शहराध्यक्ष पदासाठी महापालिकेतील माजी गटनेते अरविंद शिंदे, प्रदेश चिटणीस संजय बालगुडे, ज्येष्ठ नेते वीरेंद्र किराड आणि दत्ता बहिरट यांच्या नावांची चर्चा होती. आगामी निवडणुकीसाठी पुण्यातील पक्ष संघटनेत बदल करावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. मात्र बागवे यांच्या जागी कोण? यावर कोणाची निवड करायची यावर एकमत होत नव्हते नव्हते. बागवे यांना बदलण्याची मागणी शहरातून होत होती. मात्र त्याची दखल पक्षाने घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे निकटवर्तीय असणाऱ्या बागवेंची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. पुणे शहराध्यक्ष निवडताना नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागवे यांनाच पसंती दिली आहे. 



आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणूका उमेदवार निश्चितीमध्ये तसेच राष्ट्रवादी बरोबरच्या आघाडीच्याच्या चर्चा आणि वाटाघाटी यामध्ये रमेश बागवे यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. २०१९ च्या दोन्ही निवडणुकांमध्ये पुणे  काँग्रेसची कामगिरी निराशाजनक राहिली होती. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने हे चित्र पालटावाची जबाबदारी त्यांच्याकडे आली आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.