मुंबई: ओबीसी आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे..सदर बैठकीसाठी शिवसंग्रामच्या वतीने आ. विनायकराव मेटे यांनाही आमंत्रित करण्यात आले होते.सदर बैठकीदरम्यान आपले मत व्यक्त करताना आ. मेटे यांनी मा. मुख्यमंत्री यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करून सांगितले की ओबीसीचे राजकीय आरक्षणास आमचा विरोध नव्हता, नाही आणि भविष्यातही नसणार.परंतु अनेक मंडळी राजकीय आरक्षण भेटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये या मतावर ठाम आहेत. त्यासाठी सरकारने स्पष्ट केले पाहिजे की, निवडणुका किती कालावधीसाठी पुढे ढकलणार आहे हे स्पष्ट केले पाहिजे निवडणूक आयोग यासाठी परवानगी देणार आहे का. याबाबत आराखडा मांडला पाहिजे, तसेच या बाबतीत निवडणूक आयोग आणि विधी व न्याय विभागाचे काय म्हणणे आहे त्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले पाहिजे.
तसेच ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत आजच्या इम्पेरियल डाटा जो जमा आहे त्यावरून ओ.बी.सी आरक्षनासंदार्भात प्लान करून हा इम्पेरियल डाटा कशाप्रकारे गोळा केला जाईल याबाबत शासनाने सांगितले पाहिजे, विशेषतः ग्रामीण भागात ग्रामपंचायत ग्रामसेवक व तलाठी यांच्यामार्फतही हा डाटा लवकरात लवकर जमा करता येऊ शकतो त्याबद्दल सरकारने विचार केला पाहिजे तसेच यावेळी आपले मत मांडताना आ. मेटे यांनी राजकीय मागासलेपण हे कसे ठरवणार याबद्दल स्पष्टीकरण सरकारने तात्काळ द्यावे.या बैठकीमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ५० टक्याच्या आत राहून हे आरक्षण घेतले पाहिजे अश्या अनेक महत्त्वाच्या सूचना मांडल्या या सूचना ओबीसींना राजकीय आरक्षणाबाबत फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे त्यावर सरकारने अंमलबजावणी करावी असे मतही या वेळी आ. विनायकराव मेटे यांनी मांडले.या बैठकीदरम्यान सर्वांचे मत मतांतरे ऐकून घेऊन समारोप भाषणामध्ये मा. मुख्यमंत्री यांनी येत्या चार ते पाच दिवसात याबाबत विचारविनिमय करून पुढील शुक्रवारी निर्णय घेण्यात येईल असे सांगून उपस्थित सर्व सदस्यांना पुन्हा निमंत्रित केले.
या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अनिल परब, अशोक चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.