पुण्यात भाजपचे कसबा गणपती मंदिर येथे धार्मिक स्थळे न उघडणाऱ्या राज्य सरकार विरोधात शंखनाद आंदोलन

Shankhanad-movement-at-Kasba-Ganpati-Mandir

 पुणे: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. हे. उद्धव ठाकरे सरकारने धार्मिक स्थळ तातडीने उघडी करावीत यासाठी आज पुणे शहरात भाजपतर्फे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.


भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे. यात चंद्रकांत पाटील यांनी नियम मोडून आजच मंदिरात शिरण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. भाजपचे काही कार्यकर्ते कसबा गणेश मंदिरात शिरल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं लादलेल्या नियमांचं भंग केला म्हणून आवश्यक त्या कारवाईला सामोरं जाण्यास आम्ही तयार आहोत. पण हिंदूंच्या भावना आता सरकारला दुखावू देणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


माझं वारंवार प्रशासनाला म्हणणं आहे की याचं काटेकोर नियम पाळून मंदिर उघडावं. किती लोकांना प्रवेश द्यायचे? काय निर्बंध लावायचे? ते सरकारनं ठरवावं आणि मंदिर सुरू करावीत. दारुची दुकाने इंडस्ट्री आणि पब सुरू केले तसे मंदिरं सुरू करा. तिसऱ्या लाटेची भिती आहे तर सर्वच सुरू करा. फक्त मंदिरच बंद का?, असा सवालही त्यांनी केला.


कोरोनाचागैरफायदा घेत राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांची सर्वप्रकारे मुस्कटदाबी करण्याचा चंग बांधलेला दिसतो. त्यामुळेच ऐन सणासुदीला मंदिरं, प्रार्थनास्थळ बंद करण्याची दुर्बुद्धी यांना सुचतेय. भारतीय जनता पक्ष या वृत्तीचा तीव्र निषेध करत आला आहे आणि करत राहील -  जगदीश मुळीक - पुणेशहराध्यक्ष, भाजप





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.