पुण्यात शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या मॉलवर दगडफेक अन् भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

 

पुण्यात शिवसैनिकांकडून नारायण राणेंच्या मॉलवर दगडफेक अन् भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या

पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पुण्यासह राज्यभरातील शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. या शिवसैनिकांनी पुण्यात डेक्कन येथे जोरदार निदर्शने केली. यावेळी डेक्कन जिमखाना परिसरात असलेल्या नारायण राणे यांच्या आर. डेक्कन मॉलवर शिवसैनिकांकडून दगडफेक करण्यात आली. मॉलच्या मागच्या भागातील काचा दगडफेक करुन फोडण्यात आल्या.


शिवसेनेच्या वतीने  नारायण राणे यांच्या वक्त्यावचा निषेध करण्यात आला. ज्या वेळी राणे आणि त्यांची फॅमिली पुण्यात येईल त्या  वेळी शिवसैनिक त्यांच्या अंगारवर गेल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणे असतील निलेश राणे असतील किंवा नारायण राणे असतील हे त्यांच्या उंचीपेक्षा मोठा घास घेतात  त्यांच्या ज्या प्रमाणे  राणे बोलतात त्याच प्रमाणे त्यांना आम्ही प्रतिउत्तर देऊ. अशा बेताल वक्तव्य करणार्यांना शिवसैनिक ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विशाल धनावडे यांनी दिला.  


शिवसेना पार्वती विभाग प्रमुख सुरज लोखंडे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात कोंबड्या सोडल्या. तसेच ‘नारायण राणे चोर है’, अशी घोषणाबाजी करण्यात आली. महिला शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या पोस्टरला जोडे मारले. नारायण राणे यांनी शिवसेना प्रामुळं उद्धव ठाकरे यांची माफी मागावी. अन्यथा नारायण राणे यांना पुण्यात फिरू देणार नाही, असे महिला शिवसैनिकांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.