अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला आंबील ओढ्यात फेकले, ४० वर्षीय निर्दयी मातेवर गुन्हा दाखल

 

The baby born out of an immoral relationship was thrown into the Ambil stream

सहकारनगर:  पुण्याच्या सहकारनगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. अ अनैतिक संबंधातून झालेल्या बाळाची बदनामी टाळण्याकरिता जन्मदात्या आईनेच एक दिवसाच्या मुलाला ओढ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातल्या आंबील ओढ्यात टाकणाऱ्या बाळाला टाकणाऱ्या ४० वर्षीय निर्दयी मातेवर दत्तवाडी पोलीसांची कारवाई केली.

या घटनेचा तपास करताना पोलिसांनी परिसर पिंजुन काढला होता.संपूर्ण दत्तवाडी पोलीस स्टेशनची हद्द पिंजून काढली आणि या महिलेचा शोध लावला. अनैतिक संबंधातून जन्मलेले हे बाळ बदनामी टाळण्यासाठी या महिलेने टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तिला अटक केली नसल्याचे सांगितले आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आंबील ओढा परिसरात दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री लहान बाळाच्या रडण्याच्या आवाजाने स्थानिक नागरिक जागे झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.आंबिल ओढ्याच्या कडेला चिखलात एक दिवसाचे नवजात जिवंत बालक सापडले होते त्यानंतर दत्तवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या बाळाला चिखलातून बाहेर काढले. महिला पोलिसांनी त्याला मायेची ऊब दिली आणि ससून रुग्णालयात दाखल केले. 



हे पण वाचा, 

सिंहगड रोडला संतोष हॉल चौकात ‘द बर्निंग कार’चा थरार' गाडीने पेट घेतला, बघ्यांकडून फोटो अन् विडिओ काढण्यासाठी गर्दी



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.