पुणे: पुणे शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व जलकेंद्रात विद्युत आणि पंपिंगविषयक तसेच स्थापत्यविषयक तातडीची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 2 सप्टेंबर म्हणजेच गुरूवारी संपूर्ण शहराचा संपूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारीही काही भागात पाणी उशीरा किंवा कमी दाबाने येणार असल्याची माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.
पाणीपुरवठा बंद सुचना ! #PMCUpdate#PMC#पाणीपुरवठा#पुणे_महानगरपालिका pic.twitter.com/d5RnKRimGU
— PMC Care (@PMCPune) August 31, 2021
गेल्या महिन्याभरात काही जलकेंद्रातली कामे करण्यात आली होती. आता पर्वती, वडगाव, एसएनडीटी, लष्कर जलकेंद्र भाग, नवीन होळकर आणि चिखली पाणीपुरवठा केंद्रात तातडीने दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. स्थापत्य विषयक तातडीच्या दुरुस्तीसाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे असे महापालिकेकडून कळवण्यात आहे आहे.