शेतात गाय बांधण्याच्या किरकोळ कारणावरून भावकीच्या भांडणात महिलेचा दुर्दैवी मृत्यू



शेतात गाय बांधण्याच्या किरकोळ कारणावरून भावकीच्या भांडणात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

घोटवडे: मुळशी तालुक्यातील घोटवडे येथील लांडगेवाडीमध्ये शेतात गाय बांधण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात एका महिलेचा खून करण्यात आला आहे. " आमच्या शेतात गाय का बांधली " असा जाब विचारल्यावरून सख्ख्या चुलत भावांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचे रुपांतर मोठ्या भांडणात झालेघटनेने परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आहे. 


पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाय शेतात का बांधली असे विचारले असता सख्ख्या चुलत भावांमध्ये आज सकाळी भांडणं झाली. त्या भांडणाचा विपर्यास होऊन झालेल्या मारामारीत महादेव लांडगे, वडील गुलाब बाबू लांडगे, आई मुक्ताबाई लांडगे, बायको सुरेखा लांडगे, मुलगा वैभव लांडगे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी होऊन मुक्ताबाई लांडगे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


Tragic-death-of-a-woman-in-a-quarrel-over-a-minor-cause-of-tying-a-cow-in-a-field


महादेव यांचे चुलत भाऊ दत्ता लांडगे, प्रविण लांडगे आणि त्यांची आई सुमन लांडगे यांनी काठ्या, कोयता व कुहाडीने हा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस हवालदार अनिता रवळेकर, सुधीर होळकर, रॉकी देवकाते यांनी घटनास्थळावर धाव घेतली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.