हवेली तालुक्याचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बारवकर यांची महसूल विभागाकडून तडकाफडकी बदली



प्रतिनिधी: विशाल भालेराव 

 खडकवासला: हवेली तालुक्याचे  प्रांताधिकारी  तथा उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांची महसूल विभागाने तडकाफडकी बदली केली आहे. त्यांच्यावर कामात अनियमिततेचा ठपका ठेवण्या आला आहे.

सचिन बारवकर यांच्याविरूद्ध प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महसूल विभागाने कारवाई केली आहे. बारवकर यांनी निर्णय दिलेल्या २५१२ प्रकरणांपैकी ७९८ प्रकरणांची अंशत: तपासणी केली असता ४६५ प्रकरणी नोटीस बजावणी न करता कलम २३२(२) नुसार प्रकरणे कामकाजातून काढून टाकली आहेत. अशा कार्यपद्धतीमुळे पक्षकारांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच अर्धन्यायिक प्रकरणे हाताळताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता केली आहे. यामुळे महसूल विभागाने बारवकर यांनी शासकीय कर्तव्ये व जबाबदारी यांचे पालन न केल्याचे कारण देत बारवकर यांची बदली केली आहे.

बारवकर यांना उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र.६ सांगली या श्री.शंकरराव जाधव यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणार्‍या पदावर नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.