चक्क! जुन्या हवेली पोलीस स्टेशन मध्येच चोरट्यांनी केली चोरी

 


पुणे: पुण्यातील खडकमाळ मामलेदार कचेरीच्या आवारात असलेल्या जुन्या हवेली ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा प्रकार समोर आला आहे. सध्या हे पोलिस ठाणे सिंहगड रस्त्यावरील अभिरूची मॉलजवळ आहे. मात्र या पोलीस स्टेशची मुद्देमाल खोली अजूनही मामलेदार कचेरीच्या आवारातच आहे. या ठिकाणी जुन्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल या ठिकाणी ठेवला होता. चोरट्यांनी पोलीस ठाण्याच्या बंद असलेल्या मुद्देमाल खोलीच्या छताची कौले काढून गुन्ह्यात जप्त केलेले अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या, ताब्यांची तार, लोखंडी पत्रे व इतर असा २७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे


हवेली पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिलीप गायकवाड यांनी याबाबत खडक पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुद्देमाल कारकून अधून मधून या ठिकाणी पाहणीसाठी येत असत. काही दिवसांपूर्वी आल्यानंतर त्यांना मुद्देमाल खोलीतील साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. तसेच, त्या खोलीची कौले देखील उचकल्याचे दिसून आले. १३ जून ते १५ जुलै दरम्यान ही घटना घडली आहे. 


अज्ञात चोरट्यांनी या खोलीच्या छताची कौले काढून आतमधील १५ किलोच्या अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या, ४५ किलो तांब्याची तार, एक गॅस सिलेंडर, लोखंडी टी टाइप पत्रे ७०, लोखंडी काटेरी तांब्याची तार ४०० फूट, २२५ किलो शिशाच्या लाद्या, ४०० किलो अ‍ॅल्युमिनियमच्या लाद्या असा २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरट्यांनी टेम्पोतून माल पळविल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार सहायक निरीक्षक दादासाहेब सावंत हे अधिक तपास करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.