"केंद्र सरकारने राज्याला इशारे देण्याऐवजी आपल्या या उन्मत्त नेत्यांना आवर घालावा" प्रशांत जगताप

 


पुणे: राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन केलं आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही देखील यावर भाष्य केले करण्यात आले आहे.

  

राज्यात दारुविक्रीला मुभा मग देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांकडूनच फक्त कोरोनाचा प्रसार होतो का? आज काहीही झालं तरी मंदिरात प्रवेश करणार आणि सरकारला मंदिरं खुली करण्यासाठी भाग पाडणार असा रोखठोक पवित्रा चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे. पंढरपुरात देखील भाजपकडून जोरदार आंदोलन सुरू असून कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


दरम्यान, भाजपच्या या आक्रमक पावित्र्यांनंतर आता, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देखील यावर भाष्य केले असून, त्यांनी भाजपला ट्विटरच्या माध्यमातून खडे बोल सुनावले आहेत. "कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने केंद्रातील भाजप सरकारने धोक्याचा इशारा दिलेला असताना राज्यातील भाजप नेते काही निरर्थक यात्रा काढत आहेत, मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने राज्याला इशारे देण्याऐवजी आपल्या या उन्मत्त नेत्यांना आवर घालावा". असे जगताप यांनी म्हटले आहे. 

Sinhagad tIMES


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.