खानापूर: सर्वत्र कोरोना संक्रमणाचा वाढता प्रभाव लक्षात घेता आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक असल्याने गरजेचे बनले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राज्यभरात वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या लाटेतील लसीकरणाचा फायदा लक्षात घेता, नागरिक लसीकरण करण्याकडे वळू लागलेत. खानापूर आरोग्य केंद्रामार्फत काल मालखेड गावामध्ये अबाल-वृद्धांना होणाऱ्या लसीकरणाला सुरवात झाली आहे. यात तरुणांसह ज्येष्ठांनीही अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या लसीकरण अभियानात जवळपास दोनशेहून अधिक जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.
कोरोना मुक्त गाव करण्यासाठी, व्यापक जनजागृती ,कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे पालन, वेळोवेळी आरोग्य तपासणी आणि बाधितांचे विलगीकरण आणि सामुहिक इच्छाशक्तीला मिळालेली प्रयत्नांची जोड यामुळे मालखेड हे गाव पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे. यासाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या आशा कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आरोग्य खात्याने सदर लसीकरण मोहीम राबवल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत. मालखेड गाव करोनामुक्त झाले असले तरी करोनाचा धोका टळलेला नाही. प्रशासनाकडून वारंवार तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार वेळोवेळी गावातील सर्व कुटुंबांची, आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने तपासणी करण्यात आली. ताप, सर्दी खोकला आणि थकवा अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची अँटिजेंन टेस्ट करून त्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवण्यात आले. त्यामुळेच गाव करोना मुक्त झाले. असे पोलीस पाटील सुप्रिया जोरी यांनी सांगितले.
खानापूर आरोग्य केंद्राच्या भागातील शनिवार पर्यंत करोना ६ पॉझिटिव्ह रुग्णाची असून एकूण संख्या ८१३ असून ७७१ रुग्ण बरे झाले आहेत त्यांना डिस्चार्ज केले आहे. तर आतापर्यंत तर ३६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. खानापूर मध्ये १ पॉझिटिव्ह रुग्ण तर गोऱ्हे खु. मध्ये ५ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत.
या वेळी डाॅ.अभिजीत झिने वैद्यकीय अधिकारी ,डाॅ.योगेश पोकळे समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, श्रीमंती जव्हेरी ,श्रीमंती सपकाळ, अलका लच्छान गटप्रवर्तक, आशा वर्कर सुवर्णा जोरी, गीता पवार, जयश्री सांबरे, डाटा ऑपरेटर सुवर्णा जोरी, अनुराधा जगताप, मयूर एक्के हे उपस्थित होते.