हडपसर: पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी प्रशांत जगताप यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. याकरीत पत्रकार परिषदेचे आयोजन प्रशांत जगताप यांनी केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारणीत शहरातील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. या कार्यकारणी मध्ये १५% महिलांना स्थान देण्यात आले आहे. ही कार्यकारणी आगामी महापालिका निवडणुकीत सत्ता पालटवण्याचे काम करेल असा विश्वास जगताप यांनी बोलून दाखवला.
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. शंतनू जगदाळे तर तर कार्याध्यक्षपदी संदीप बधे आणि अमर तुपे यांची निवड करण्यात आली आहे. हडपसर मतदार संघाचे स्वरूप पाहता समाजातील सर्व स्तरातील व वर्गातील कार्यकार्त्यांना योग्य स्थान देण्यात आले आहे.
"आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्य शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे व हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी हडपसर मतदार संघातील आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्रितकरून पुणे महानगर पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला जाईल. या मध्ये हडपसर मतदार संघ निर्णायक असेल अशी खात्री देतो. हडपसर मतदार संघात प्रभागात बूथ प्रमाणे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करण्याचे काम केले. सर्व सामान्यांना न्याय देण्यासाठी राष्टवादी कटिबद्ध असेल" डॉ. शंतनू जगदाळे अध्यक्ष - राष्ट्रवादी हडपसर मतदार संघ
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघाची कार्यकारणी खालील प्रमाणे
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघ उपाध्यक्ष - वासंती काकडे, संदीप भानुदास तुपे, फारुख इनामदार, प्रशांत म्हस्के, जतिन कांबळे, विजया कापरे, राहुल घुले.
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघ सरचिटणीस - राजेंद्र गारुडकर, उदयसिंह मुळीक, संजय लोणकर, शालिनी जगताप, रईस सुंडके, संजय गायकवाड, रामभाऊ कसबे, राजेश आरणे.
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघ चिटणीस- संजय बबन घुले, प्रशांत घुले, योगेंद्र गायकवाड, दत्ता शिंदे, राहुल होले, संकेत कवडे.
राष्ट्रवादी हडपसर मतदार संघ संघटक सचिव - प्रदीप मगर, निलेश घुले, संजय शिंदे, महेश सातव, अन्वर शेख, सुशीला गुंजाळ, हेमंत बधे.