पुणे: स्व. जमनादास गीताराम गुप्ता (गर्ग) यांच्या 11 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित्त मनिराम गुप्ता संचालित एम जे. असोशिएतर्फे "भजन संध्या" या संगीत कार्यक्रमाचे पुण्यातील औंध रोड येथील जमना अपार्टमेंट येथे आयोजन करण्यात आले होते. स्व जमनदास गुप्ता हे एक अध्यात्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्व होते व त्यांनी अनेक गोरगरिबांना मदत केली होती. त्यांच्या स्मृतीनिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
या भजन संध्या कार्यक्रमामध्ये स्वामी हिमांशू ,गायिका स्वरांगी काळे, तबला वादक सतीश काळे , बालगायक ओवी काळे यांच्या समूहाने उत्कृष्ट भजने सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी गायक गोकुळ महाजन, गायिका प्राजक्ता बिबवे व गायक प्रशांत निकम यांनीही या कार्यक्रमात भजन सादर केले.
जमनादास गुप्ता यांच्या स्मृतिदिनानिमित्त लेखक गोकुळ महाजन द्वारा संग्रहित "माँ जीण शक्ति मंगल पाठ" या पुस्तकाचे प्रिंटिंग व मोफत वाटण्यासाठी सहकार्य मनीराम गुप्ता करणार आहेत. श्रावी मीडिया अँड फिल्म प्रॉडक्शनच्या फेसबुक पेज द्वारे लाईव्ह करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीमुळे या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसेच सरकारच्या फिझिकल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी नॅशनल इन्शुरन्स कंपनी चे निवृत्त अधिकारी व एमजे असोसिएटचे मनीराम गुप्ता, इन्वेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गोकुळ महाजन, स्वामी हिमांशू,स्व.जमनादास गुप्ता यांच्या पत्नी शांतादेवी गुप्ता, विमलादेवी गुप्ता, गोयल कॉमर्स क्लासेस च्या संचालिका सरला महाजन, सतीश काळे, स्वरांगी काळे, गायिका प्राजक्ता बिबवे, दिनेश वर्मा, रीना गुप्ता, पिराजी मवलनकर, श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन चे संचालक विवेककुमार तायडे, श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शनचे कार्यकारी संचालक व गायक प्रशांत निकम आदी मान्यवर उपस्थित होते.