कात्रजचा खून झाला, उलट सुलट राजकीय चर्चाना उधाण; बॅनर कोणी लावला हे अजून अस्पष्ट

 

कात्रजचा खून झाला, उलट सुलट राजकीय चर्चाना उधाण; बॅनर कोणी लावला हे अजून अस्पष्ट

कात्रज: कात्रजच्या मेन चौकात "कात्रजचा खून झाला" अश्या आशयाचे गंभीर बॅनर लावल्याने या परिसरात उलट सुलट चर्चाना उधाण उधाण आले आहे. अज्ञातांनी रात्रीच्या वेळी २० बाय ३० फुटाचा भला मोठा बॅनर खाजगी जागेत लावला होता. तो महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने काढला. पण रात्रीच्या वेळेस लावलेल्या बॅनर मुळे येथील राजकीय चर्चा चालू झाल्या. याच्या मागे राजकीय कारण आहे की दुसरं काही कारण? 


मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी कात्रज च्या उड्डाण पुलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. त्यामुळे कात्रजच्या स्थानिक उद्योग धंद्यावर फरक पडणार की, नवीन प्रभाग रचनेमुळे? पूर्वी चारचा प्रभाग करून कात्रजचे विभाजन झाले होते. यावेळीही तसेच काही होईल आणि कात्रज विभाजन होऊन विकासाला खीळ बसेल म्हणून हा बॅनर एका कात्रजकराने लावला असल्याच्या चर्चा रंगत आहेत.


 हा भलामोठा बॅनर कात्रज पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर लावण्यात आला आहे.  अनधिकृत बॅनर लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.