पुणे: सर्वच राजकीय पक्षांना पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यातच आम आदमी पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेबाबत मोठी घोषणा आहे. आम आदमी पार्टी पुणे महापालीच्या निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची निवडणुकीची चुरस आणखीच रंगतदार होणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आता आपही निवडणूक रिंगणात दिसणार आहे. आम आदमी पार्टीच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेत पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची मोठी घोषणा केली.
पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी च्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. आणि या 'भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ , सर्व वाटून खाऊ' या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. , “गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल.” रंगा राचुरे- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, आम आदमी पार्टी
पुण्याच्या बजेट मधील निधी मूलभूत सुविधा ऐवजी सुशोभीकरणा वर खर्च होतो आहे. दिल्लीत केवळ वचननामा दिला नाही तर सर्व आश्वासन पूर्तता केली. तोच विश्वास आम्ही पुणेकरांना देऊ इच्छितो. निधीचा अपव्यय टाळला तरी मोठे उद्दिष्टे साध्य होऊ शकतात असे आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले. तसेच आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अश्या स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो असे आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत , संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे , संदेश दिवेकर, विद्यानंद नायक आदी उपस्थित होते.