पुणे: पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू सदर पूल सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीस अडथळा ठरणार आहे. याबाबत गणेश भक्तांनी आमचेकडे तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी केली असून दि.६/९/२०२१ रोजी लेखी मागणी केलेली आहे.
पुणे शहरातील विकासकामे, प्रकल्प व अन्य बाबी याबाबत उपाय योजना करणेचा तसेच मेट्रो प्राधिकरण अथवा अन्य प्राधिकरणास आदेश देण्याचा अधिकार महानगरपालिकेस पूर्णपणे आहे. लंडन शहरात फोल्डिंग ब्रिज असून तो ब्रिज त्या शहराच्या वैभवात भर टाकणारा आहे. पुणे शहरात लकडी पूलावरील मेट्रो पूल अत्याधुनिक पध्दतीने फोल्डिंग ब्रिज केल्यास १२५ हून अधिक वर्ष झालेल्या सार्वजिक गणेशोत्सवातील विसर्जना मिरवूणकीस ठरणारा अडथळा देखील दूर होणार आहे. शहरातील अति महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा हा पूल असून भविष्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत याठिकाणाहून मोठी वाहतूक करणे गरजेचे ठरणार आहे. पुणे शहरात प्रकल्प करणारे मेट्रो प्राधिकरण तसेच अन्य प्राधिकरण व महानगरपालिका यांचेमध्ये सुसंवाद नसल्याने नियोजनाचा अभाव होवून असे अनेक अडथळे समोर येतात.
गणपती विसर्जनातील अडथळा दूर करणारा लंडन शहराच्या धर्तीवर लकडी पूलावरील मेट्रो पूल फोल्डिंग पध्दतीने करण्यात यावा. सदर विषयी सविस्तर चर्चा करणेसाठी मा. महापौर, मेट्रोचे अधिकारी, महानगरपालिका प्रशासन व सर्व पक्षीय नेते यांची बैठक तात्काळ बोलवावी व सार्वजनिक गणशोत्सव विसर्जन मिरवणूकीचा मार्ग मोकळा करावा. आबा बागुल - कॉंग्रेस पक्षनेता, पुणे महानगरपालिका
ऐतिहासिक पुण्याचा वारसा जपणेसाठी आम्ही अनेक मागण्या करतो, कालच आम्ही उपरोक्त प्रकरणी पत्र दिले असून माहिती घेवून आज उपाय सुचवित आहोत. सुचविलेल्या उपायाची अंमलबजावणी करणे आवश्यक असून तोपर्यंत सदर पूलाचे कोणतेही काम करू नये. सध्याच्या आधुनिक काळात तांत्रिकदृष्टया शक्य असलेला बदल केल्यास जगभरात हा पूल आकर्षण ठरून पुणे शहराचे पर्यटनात देखील वाढ होणार आहे.