'स्वप्न स्वरूप प्रॉडक्शन' निर्मित 'तू गणराया' गाण्याचा प्रेक्षकांनी घेतला मनमुराद आनंद
मुंबई: गणेशभक्तांच्या भेटीसाठी एकामागोमाग एक गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गणरायाच्या आगमनासाठी उत्सुक असलेली ही गाणी प्रेक्षकांनाही मंत्रमुग्ध करून सोडत आहेत. अशाच एका 'तू गणराया' या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. या गणयाची विशेष बाब म्हणजे 'स्वप्न स्वरुप प्रॉडक्शन' निर्मित आणि सचिन आंबात दिग्दर्शित श्री गणेशाच्या आगमनानिमित्त नवचैतन्य देणार्या ' तू गणराया ' या गाण्याचे पोस्टर माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या शुभ हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विनोदजी तावडे यांनी देखील गाण्याला भरभरून शुभेच्छा दिल्या असून दमदार कलाकारांना घेऊन चित्रित केलेल्या या गाण्याचे कौतुकच केले आहे.
'तू गणराया' या गाण्यामधे एका नव विवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतुट नात जपत, बायकोला प्रोत्साहन देत, आणि स्वतः पुढाकार घेऊन एका नवीन परंपरेचा श्री गणेशा या गाण्यातून सादर केला. अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांनी या गाण्यात अभिनय आणि नृत्याच्या जोरावर गाण्याची शोभा वाढविली. तर दिग्दर्शक सचिन आंबात दिग्दर्शित असलेल्या या गाण्याचे बोलही त्यांनीच लिहिले आहेत. गायिका स्नेहा महाडीक आणि गायक रोहित ननवरे यांनी आपल्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून प्रेक्षकांना प्रत्यक्षात अनुभवण्यास दिली. इतकेच नव्हे तर रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीतबद्ध देखील केले आहे.
'स्वप्न स्वरूप प्रॉडक्शन' निर्मित या गाण्याची झलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून 'स्वप्न स्वरूप' युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून तब्बल १ लाखाहून अधिक व्यूजचा टप्पा पार करत गणेशभक्तांनी गणेशाच्या स्वागतासाठी 'तू गणराया' या गाण्यात तल्लीन होऊन मनोभावे स्वागत केले आहे. नवसंदेश देणाऱ्या या गाण्याचे सादरीकरण पाहून माजी सांस्कृतिक मंत्री विनोदजी तावडे यांनी या प्रसंगी कौतुकाची थाप दिली.