खडकवासला: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक उपक्रमांवर बंधने असली, तरी आपत्ती काळातील गरज ओळखून आझाद हिंद गणेश मंडळाने रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविला आहे. आझाद हिंद तरुण मंडळाने रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन इतिहास संशोधक डॉ नंदकुमार मते यांच्या हस्ते करण्यात आले.
शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यंदा सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने घातली आहेत. गणेशोत्सवातील कार्यक्रम विशेषतः दरवर्षीचा सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम रद्द करून खडकवासला येथील आझाद हिंद गणेश मंडळाने रक्तदान शिबिराचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार सध्याच्या आपत्ती काळात रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर राबविण्यात आले.
प्रादेशिक रक्तकेंद्र ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या सहकार्याने या शिबिरात मंडळाच्या कार्यकर्त्यांसह २५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. सध्याच्या काळात अत्यावश्यक असणाऱ्या रक्ताची उपलब्धता करण्यासाठी गणेशोत्सवाच्या निमित्ताने तालुक्यातील पहिलाच उपक्रम राबविल्याबद्दल खडकवासला गावातून या मंडळाचे कौतुक केले जात आहे. आयोजक प्रभात मते पाटील यांनी रक्तदात्यांचे आणि सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.
या वेळी विलासअण्णा मते, मा .उपसरपंच डाॅ .नंदकिशाेर मते, मा.उपसरपंच संदिप पाटील मते, महारष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेस सरचिटणीस आनंदभाई मते, भा.ज.पा नेते अनिल मते, म.न.से नेते विजय मते, म.न.से नेते अतुल मते सरपंच, सौरभ (नाना) मते, पत्रकार तुळशीदास मते, काॅंग्रेस नेते सुरेश तात्या मते, तंटामुक्ती अध्यक्ष - शांतारामअण्णा मते , पै.चंद्रशेखर बाबा मते, रुपेश मते, अविनाश तिकाेणे, परेश मते अभिषेक मते, निलेश मते, दिपक मते सुनील जोरे दिनेश थाेपटे आदी उपस्थित होते. तसेच आझाद हिंद तरुण मंडळाचे सर्व सभासद प्रभात मते पाटील (युवा उद्योजक), नयन खालकर, दत्ता ठाकर, अमोल गवारे, आकाश गुरव, निरजंन थोपटे, अनिकेत मते, ओम मते, अथर्व मते यूसुफ़ ताबोंळी, गौरंग मते, नयन जोरे, ऋत्विक मते, अजय कांबळे, अभीजीत ठाकर, मनीष मते, वेदांत मते, केतन मते आदींचे सहकार्य लाभले.