किल्ले सिंहगड परिसराच्या पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करण्याचे अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

 पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी, नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या किल्ले सिंहगडाच्या विकासाकरिता आज पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किल्ले सिंहगड परिसर विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी किल्ले सिंहगड परिसराच्या पुरातन वारशाला शोभेल आणि पर्यावरणाला अनुरूप असा विकास करावा, असे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले. 


सिंहगड परिसरातील वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनांचा उपयोग करावा. वाहनतळावर वाहनचालकांसाठी देखील सुविधा असावी. पर्यटकांसाठी स्वच्छता गृहाची सुविधा करण्यात यावी. पर्यटकांना इतिहासाविषयी माहिती मिळावी आणि पर्यटनाचा आनंदही घेता यावा, हा दृष्टिकोन समोर ठेऊन विकास करावा, अशा सूचनाही केल्या. पर्यटकांना माहिती देण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषा जाणणाऱ्या स्थानिकांना गाईड म्हणून प्रशिक्षण देण्यात यावं. पर्यटकांना पिठलं-भाकरीसारखे स्थानिक पदार्थ उपलब्ध करून द्यावेत. हे सिंहगड परिसराचा विकास करताना सिंहगड किल्ल्याच्या  सौंदर्याला कोणतीही बाधा येणार नाही, याची दक्षता घ्यावी. असेही अजित पवार म्हणाले. 



यावेळी मा. जि. प. सदस्य नवनाथदादा पारगे यांनी सिंहगड किल्यावर आणि परिसरात पर्यटनाला चालना मिळून, स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा व त्यायोगे सिंहगड परिसराचा विकास व्हावा अशी विकासाभिमुख भूमिका मांडली.


आजच्या या बैठकीच्या निमित्ताने खा. सुप्रियाताई सुळे पर्यटन विभागाचे अधिकारी, नगरसेवक दिलीपभाऊ बराटे, मा. जि. पं उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे, नगरसेवक सचिनभाऊ दोडके, राष्ट्रवादी काँ. खडकवासाला विधानसभा शहर अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, मा. जि. प. सदस्य नवनाथ पारगे, राष्ट्रवादी काँ. खडकवासाला विधानसभा ग्रामीण अध्यक्ष त्रिंबकअण्णा मोकाशी, सरपंच अशोक गोगावले, सुरेश गुजर, युवराज मोरे, विजय गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.