ताज इव्हेंट अँड प्रोडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल धमाका येथे मिस्टर मिस व मिसेस 2021 स्पर्धेच्या क्राउन लॉन्चिंग

ताज इव्हेंट अँड प्रोडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल धमाका येथे मिस्टर मिस व मिसेस 2021 या स्पर्धेच्या क्राउन लाँच


पुणे: ताज इव्हेंट अँड प्रोडक्शनतर्फे पुण्यातील हॉटेल धमाका येथे मिस्टर मिस व मिसेस 2021 या स्पर्धेच्या क्राउन लाँच  व पुणे ऑडिशन चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलम जाधव, धमाका हॉटेलच्या संचालिका रूपाली सायखेडकर, फॅशन डिझायनर नीतू झा, ताज मिस इंडिया 2021 विजेत्या प्रीसीडा वंजारे, ताज मिसेस इंडिया 2021 च्या गोल्ड विनर निवेदिता पगार, ताज मिसेस इंडिया 2021 चा प्लॅटिनम विनर प्राची भावसार,ताज इव्हेंट अँड प्रॉडक्शनचे व्यवस्थापकीय संचालक परेश वैद्य उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील विविध टॅलेंटचा शोध घेऊन ताज इव्हेंट अंड प्रोडक्शन तर्फे लवकरच ग्रँड फिनालेचे आयोजन पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. ताज इव्हेंट अंड प्रोडक्शन या संस्थेतर्फे आतापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. या  पुणे ऑडिशनमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिला स्पर्धकांनी आपले टॅलेंट सादर केले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा भाग्या  यांनी केले.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.