पालिकेचा स्वतंत्र निधी उपलब्ध असताना, ड्रेनेज व पावसाळी गटारेविषयक कामे करत नगरसेवकांची चमकोगिरी


 पुणे: पुणे महापालिकेने अर्थसंकल्पात ड्रेनेज आणि पावसाळी वाहिन्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र नागरसेवकाकांनी सोशल मीडियावर चाकोगिरी करण्यासाठी आपल्या वॉर्डस्तरीय निधीचा सर्वाधिक वापर याच कामासाठी केला आहे. वॉर्डस्तरीय निधीमधील सर्वाधिक १६.८ टक्के खर्च (१५ कोटी ७१ लाख रुपये) ड्रेनेज व पावसाळी वाहिन्यांविषयकच कामांसाठीच झाला आहे.


परिवर्तन संस्थेने नगरसेवकांनी केलेल्या वॉर्डस्तरीय निधीच्या खर्चाच्या विश्लेषणातून ही बाब पुढे आली आहे. या संस्थेने पुणे महापालिकेतील १६२ नगरसेवकांनी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च, २०२१ या चार वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा असलेले प्रगतीपुस्तक नुकतेच जाहीर केले आहे़. एक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित ९० कोटी ९० लाख ८७ हजार ३२६ रुपये वॉर्डस्तरीय निधीतून विविध कामांसाठी खर्च केले आहेत. प्रत्येक नगरसेवकाने वॉर्डस्तरावर सरासरी ५६ लाख ११ हजार ६५० रुपये खर्च केले आहेत. यात नगरसेवकांनी त्यांच्या हातात असलेल्या ‘स’ यादीतील म्हणजेच नगरसेवकांनी सूचविलेली कामे या कामांमध्ये आपले प्राधान्य दिले आहे. 


करोना महामारीच्या वाटपाचे काम अधिक

आपत्ती मदतकार्य या विषयात पहिल्या तीन वर्षात नगण्य खर्च होता़ मात्र गेल्या वर्षात मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, हात धुण्यासाठी साबण वाटप अशा कामात आघाडी घेत नगरसेवकांनी आपल्या भागात चांगलीच चमकोगिरी केली आहे. यात १८ कोटी ६ लाख रुपये खर्च झाले़ विशेष म्हणजे यामध्ये कापडी पिशव्यांचे वाटप हे लक्षणीय आहे़. वॉर्डातून निवडल्या गेलेल्या नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमधील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवाव्या ही चुकीची कल्पना आहे.


निवडणुकीच्या तोंडावर रखडलेली कामे मार्गी 

कोरोनामुळे उत्पन्न घटल्याने नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील कामे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र, आता गेल्या चार महिन्यात महापालिकेला अडीच हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याने ‘स’ यादीतील १० टक्के कामे करण्याचा निर्णय स्थायी समितीमध्ये घेण्यात आला असल्याने नगरसेवकांनी सुचवलेली कामे मार्गी लागणार आहेत. म्हणजेच निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर काळ्याभोर डांबराचा थर चढवणार आहे नक्की. आणि बाजूला क्षमस्व आणि दिलगिरीची भला मोठा फ्लेक्स लावून चमकोगिरी. 


`स’ यादी म्हणजे काय ?

महापालिका आयुक्त अंदाजपत्रक सादर करताना त्यात महसुली खर्च व भांडवली खर्च यासाठी ‘अ’ व ‘क’ यादीत तरदूत करतात. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांकडून त्यात बदल केले जात असताना नगरसेवकांनी त्यांच्या इच्छेनुसार कामे सुचविलेली असतात, त्यास ‘स’ यादी म्हणतात. कोरोनाच्या काळात या कामांवर बंधने आणली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.