पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते मिस अँण्ड मिसेस व्हिजन सन्मानचिन्हाचे अनावरण
पुणे: “फोर फॉक्स प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड”तर्फे एका आगळ्या-वेगळ्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. आहे. स्त्री आणि पुरुष याशिवाय समाजातला एक उपेक्षिलेला घटक म्हणजे तृतीयपंथी समाज. या तृतीपंथीयांना उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन मिळावे या हेतूने आता फोरफॉक्स प्रॉडक्शन कंपनीने पाऊल उचलले आहे. यानिमित्ताने फोरफॉक्स प्रॉडक्शन तर्फे तृतीय पंथीयांच्या आगळ्या-वेगळा अर्धनारी-नटेश्वर या फॅशन शोचे आयोजन २३ सप्टेंबर रोजी विठ्ठलराव सातव हॉल, पद्मावती सहकारनगर येथे सायंकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
तसेच मिस अँड मिसेस व्हिजन महाराष्ट्र २०२१ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजनही यावेळी करण्यात आले आहे. सर्वसामान्य व्यक्ती आणि तृतीयपंथीय यात कोणताही फरक नाही, हे जनसमाजाला दर्शवण्याचा फोरफॉक्स कंपनीचा मानस आहे. समाज हिताच्या जाणिवेने तृतीयपंथीयांसाठी उचललेले रोजगार निर्मितीचा उपक्रम नक्कीच स्तुत्य असल्याचं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं. यावेळी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते मिस अँण्ड मिसेस व्हिजन सन्मानचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
कोरोनाच्या काळात अनेकांचे रोजगार गेले, अनेकांची उपासमार झाली. अशा प्रत्येक वर्गातल्या लोकांना मदत करण्याचा अनोखा उपक्रम फोरफॉक्स प्रॉडक्शन कंपनीने सुरु केला आहे. प्रत्येकाला समाजात स्वत:चे स्थान निर्माण करता यावे, यासाठी फोर फॉक्स कंपनी कायमच तत्पर असून त्यातून समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न आम्ही करत असल्याचे फोर फॉक्स कंपनीचे संस्थापक संचालक माहिर करंजकर आणि महेश चरवड यांनी सांगितले. तर तृतीयपंथीयांना समाजात बरोबरीचे स्थान द्या. सर्व राजकिय पक्षांनी पुढाकार घेऊन तृतीयपथींयांना निवडणुकीत उमेदवारी द्यावी, असे मत पुणेरी प्राईड फाऊंडेशच्या उच्चशिक्षित तृतीयपंथी प्रेरणा वाघेला यांनी मांडले.
"सौंदर्य आणि बुद्धी याचा मिलाप सर्व जमातीमध्ये दिसून येतो. मग तिथे तृतीयपंथीयांना का कमी लेखावं? या तृतीयपंथीयांना सौदर्यांचा साज चढवण्याचा प्रयत्न मी नक्कीच करते आहे" अंजली जोशी - संचालिका, मिडास टच
त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलेल्या सहारा प्रॉडक्शन हाऊसचे संस्थापक डॉ. राजेंद्र भवाळकर यांनी मत मांडताना सांगितले, की सध्या ओटीटी हे माध्यम प्रचलित आहे. तेव्हा तृतीयपंथींयांना रोजगार मिळवून देण्याच्या दृष्टीने आणि समाजास सहाय्य मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही तृतीयपंथीयांना एक कायमचं व्यासपीठ देत आहोत. या वेळी तृतीयपंथीयांच्या रोजगारासाठी ‘द सुपर स्टोअर’ चे लॅाचिंग यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून या समाजाला आपली मते मांडण्यासाठी कुठेही जावं लागणार नाही. तृतीयपंथी म्हणा, किन्नर म्हणा. पण सल तो सल असतो. तो सल नष्ट करणं हेच खरे समाजहिताच्या दृष्टीने घेतलेलं पुढचं पाऊल वाखाणण्याजोगं आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोदी अभिनेते योगेश सुपेकर यांनी केले.
या मोहिमेमध्ये अनेक व्यक्ती आणि संस्था सहभागी झाल्या आहेत त्यामध्ये फोर फॉक्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड माहीर करंजकर, शर्वरी गावंडे, के सी चौधरी, महेश चरवड, सोनल गोडबोले, सहारा प्रोडक्शन हाऊसचे संस्थापक संचालक डॉ राजेंद्र भवाळकर, प्रणव केटरर्स चे अनिल आपटे, अखिल भारतीय जाणीव संघटनेचे श्री आनंद पायाळ आणि रवी कदम, पुणेरी प्राईड फाउंडेशनच्या प्रेरणा वाघेला आणि मयुरी बनसोड (तृतीयपंथी), बिईंग वूमनच्या संचालिका रोहिणी वांजपे आणि शुभांगी नांदूरकर, क्रेफा बुटीक च्या मनीषा महाजन, मिडास टच च्या अंजली जोशी, शो डायरेक्टर योगिता गोसावी, अभिनेत्री गौरी कुलकर्णी पूनम मिश्रा, गौरव मंडल, सुप्रसिद्ध तृतीयपंथी सुपरमॉडेल खुशी शेख, महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशनच्या संस्थापिका अभिलाषा बेलुरे, क्रांतीज्योती महिला विकासवसंस्था आणि स्रीशक्ती महिला मंच यांच्या संस्थापिका सोहनी डांगे, स्नेहल जाधव आणि सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके हे सर्व एकजूट होऊन ही मोहीम राबवित आहेत.