डोणजे: पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती पुजाताई पारगे यांच्या प्रयत्नांतून सोनापूर गावातील विकासकामांसाठी तब्बल २६.६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून विकास कामे सुरु झाली आहेत. त्या अनुषंगाने काल सोनापूर गावांत विविध विकास कामांचे उदघाटन मा. जि. प. सदस्य नवनाथ पारगे यांच्या शुभहस्ते पार पडले.
सिंहगड परिसरात पुजाताई पारगे यांनी आपल्या जिल्हा परिषद गटातील गावांतून विविध योजना राबवत मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडविले असून, बरीच विकास कामे सध्या प्रगती पथावर आहेत. यासाठी भरघोस जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध केला आहे. सोनापूर गावासाठी तब्बल २६.६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या मध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी शेड बांधणे व सुशोभीकरण, अंतर्गत रस्ता तयार करणे, बौद्धवस्ती येथे हायमास्ट दिवे बसविणे आदी कामांचा समावेश आहे. या विकास कामांचे उदघाटन मा. जि. प. सदस्य नवनाथ पारगे यांच्या शुभहस्ते पार पडले.
या उदघाटन समारंभाच्या निमित्ताने नवनाथदादा पारगे यांच्यासह मा. उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद शुक्राचार्य वांजळे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकवासाला ग्रामीण त्रिंबकअण्णा मोकाशी, हवेली पंचायत समिती माजी उपसभापती किसन बापू जोरी, राष्ट्रवादी सरचिटणीस लक्ष्मण माताळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस खडकवासाला ग्रामीण सुधाकर गायकवाड, सा. कार्यकर्ते नंदकुमार जावळकर, सोनापूर गावच्या सरपंच सौ.सुशिल रविंद्र हाडके, उपसरपंच सुरेश पवळे, ग्रा. प. सदस्य सुरज पवळे व समस्त सोनापूर ग्रामस्थ उपस्थित होते.