कराडमध्ये डोक्यावरचं छप्पर गेलेल्यांना नाम फाऊंडेशनचा मदतीचा हात, ७०० कुटुंबांना ५ हजार पत्र्यांचे वाटप

 


 कराड: संपूर्ण राज्याला परिचित असलेले नाम फाऊंडेशन आणि मदत हे जणू काही समीकरणच झाले आहे.  मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या  तडाख्याने या परिसरातील अनेक गोरगरीबांना मोठा फटका बसला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कराड ,पाटण आणि शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाना ५००० लोखंडी पत्र्याचे वाटप केले. 


नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कराड ,पाटण आणि शिराळा तालुक्यातील पूरग्रस्त बाधित ७००  कुटुंबाना ५००० लोखंडी पत्र्याचे वाटप नाम फाउंडेशनचे विश्वस्त मकरंद अनासपुरे आणि निवृत्त आयएएस अधिकारी इंद्रजित देशमुख, गणेश थोरात, देसाई,  गटविकास अधिकारी पवार, यांच्या उपस्थितीत  सातारा जिल्ह्यातील  कराड तालुक्यातील वाठार येथे करण्यात आले.  या नैसर्गिक आपत्तीत या कुटुंबांचे संसार पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीचा हात म्हणून नाम फाउंडेशनने पुढाकार घेतलाय.


 तीन तालुक्यातील सुमारे 700 गरजू कुटुंबांना हा एक मोठा दिलासा ठरला आहे.  मुसळधार पावसाच्या नैसर्गिक आपत्तीत संकटात सापडलेल्या गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी नाम नेहमीच पुढे येईल.मात्र त्याचबरोबर आपण सर्वांनी मिळून याकामी पुढाकार घेणे हीच आपली खरी संस्कृती असल्याचं अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटलंय.  याकामी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावं असं आवाहनही मकरंद अनासपुरे यांनी केले.  




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.