जुन्नरमध्ये वृद्धावर तरसाचा हल्ला, तरुण मदतीला धावला अन् जीव वाचला

जुन्नरमध्ये वृद्धावर तरसाचा हल्ला,


 जुन्नरः बिबट्याने धुमाकूळ घालण्याच्या घटना ताज्या असताना तरसानेही लोकांवर हल्ले करण्याचे दिसून आहे. वन्यप्राण्यांच्या संरक्षित अधिवासात मानवाने अतिक्रमण केल्यामुळे ते शहर आणि गावात घुसत आहेत. जंगलाजवळ असणाऱ्या रस्त्याने जाणाऱ्या वृद्धावर एका तरसाने हल्ला केल्याची घटना घडली असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. एका तरुणाने या तरसाला पिटाळून लावले. त्यामुळे वृद्धाचा जीव वाचला. 


त्यामुळे अशा घटनांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खेड तालुक्यातील एका जंगलातील रस्त्याने एक वृद्ध चालले होते. तेव्हा त्यांच्यावर पाठिमागून आलेल्या तरसाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. वृद्ध व्यक्ती आपल्याच तंद्रीत होती. अचानक झालेल्या हल्ल्याने ते गोंधळून गेले. त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला. मात्र, तरसाने पुन्हा त्यांच्यावर हल्ला केला. हे पाहता तिथे असलेला एक तरुण त्यांच्या मदतीला धावला. त्याने तरसाला काठीने मारहाण करून पिटाळून लावले. 


वृद्धावर हल्ला करणारा तरस मृत सापडल्याचे समजते. या तरसाला कशाचा तरी संसर्ग झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, खेड तालुक्यात तरसांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात अशा घटना घडू शकतात. 



तरस माणसावर हल्ला करु शकतं का याबाबत माहिती देताना कुकडोळकर म्हणाले ''वन्यजीव सहसा माणसावर हल्ला करत नाहीत. ते माणसापासून सुरक्षित अंतर पाळत असतात. माणूस त्यांच्या जवळ आला तर ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात. तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. त्यामुळे तरसामध्ये रेबिज पसरतो. रेबिजची लागण झाली असेल तर ते माणसावर हल्ले करुन चावा घेऊ शकतात. त्याचबरोबर तरस जखमी असेल किंवा मादीसोबत पिल्लं असतील तर ती माणसावर हल्ला करु शकते.'' परंतु तरसाने जाणिवपूर्वक माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच असल्याचं देखील कुकडोळकर सांगतात.


खेडच्या पशुधन विकास अधिकारी विनया जंगले म्हणाल्या, ''तरस सहसा मानवी वस्तीत येत नाही. मानवी वस्तीत आला तर तो कोंबड्या आणि इतर प्राणी खाण्यासाठी येतात. तरसाला जंगलाची स्वच्छता करणारा प्राणी म्हणतात. दुसऱ्या प्राण्याने केलेल्या शिकारीची उरलेली हाडे ते खातात. त्याचबरोबर ससे, पक्षी यांची शिकार देखील ते करतात. माणसावर सहसा ते हल्ले करत नाहीत.''


तरस प्राण्याविषयी 

 'तरस हा मुख्यत्वे कोरड्या भागात, तसेच पठाराच्या भागात आढळणारा प्राणी आहे. कमी उंचीच्या टेकड्या किंवा जमीनीखाली बिळं करुन हा प्राणी राहतो. कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व अधिक असते. त्याचा जबडा भलामोठा असतो. त्या जबड्यात प्रचंड ताकद असते. 'तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांची हडे उरलेले मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन देखील ते खातात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.