अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या नाम फाउंडेशन संस्थेशी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, तज्ज्ञ मंडळी जोडले जात आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील आयएएस अधिकारी इंद्रजित देशमुख हेही असच एक नाव आहे. इंद्रजित देशमुख यांनी आयएएस अधिकारी म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेवून आता नाम फाउंडेशनच्या विश्वस्त पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
उच्च शिक्षित असलेल्या देशमुख यांनी आपण शेतकरी कुटुंबात जन्मलेलो आहोत, त्यामुळे संतांची शिकवण आणि गरजू लोकांसाठी नाम फाउंडेशनच्या कार्यात सहभागी होताना एक वेगळेच समाधान मिळत असल्याचं म्हटलं आहे.