वादग्रस्त वक्तव्यामुळे केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, अटकेची टांगती तलवार

Ketki-Chitale-s-pre-arrest-bail-rejected-by-Thane-court


मराठी मनोरंजन विश्वातील चर्चित अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या बेधक आणि बेताल वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असते. मात्र, या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच केतकीच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केतकी कायदेशीर कचाट्यात अडकली असून केतकीला अटक होण्याची शक्यता निर्माण झालीय. एका जुन्या प्रकरणात केतकी अडकली असून या प्रकरणी ठाणे कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळला आहे. यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे


शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असो किंवा सोशल मीडियावरून शिवीगाळ करत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणं, अनेक कारणांमुळे केतकी सोशल मीडियावर चर्चेत आली होती. केतकीच्या या वक्तव्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. 


 गेल्यावर्षी म्हणजेच केतकीनं १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असं तिनं आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर तिच्या या पोस्टवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.


याचदरम्यान, आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांच्या तक्रारीनंतर केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आता ठाणे कोर्टाने देखील तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. हे प्रकरण साधारण वर्षभरापूर्वीचे असले तरी आता अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.