खडकवासला भरलं, मुठेचं पात्र दुथडी भरुन वाहू लागलंय

 


पुणे: खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु केल्याने मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय. शहराच्या मध्यवर्ती भागातील भिडे पुलाला पाणी लागलंय. नदीपात्रावरील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने नदीपात्रात सुरु असलेल्या मेट्रोच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.  टेमघर धरण रात्री भरल्यानंतर या धरण ओव्हरफ्लो झाले. त्यातून, ३०० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर या तिन्ही धरणातून मिळून सहा हजार ८५७ क्युसेक्स विसर्ग खडकवासला धरणामध्ये जमा होत आहे.



गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे काठोकाठ भरली आहे. त्यामुळे पुणेकर आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडकसावला धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग सुरु केलाय. त्यामुळे मुठा नदीचं पात्र दुधडी भरुन वाहू लागलंय.


पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी सहाशे आणि सांडव्यातून दोन हजार ६९२ असा एकूण तीन हजार २९२ क्युसेक्स विसर्ग आंबी नदीत सुरू आहे. वरसगाव धरणात वीजनिर्मितीसाठी सहाशे क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. सांडव्यातून दोन हजार ६६५ क्यूसेस अशा प्रकारे तीन हजार २६५ क्यूसेकचा विसर्ग मोसे नदीत सुरू आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.