धायरी: गेल्या महिन्यात २३ ऑगस्टला सिंहगड रोड भागामध्ये धायरी येथे मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह डायलेसिस युनिटचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. कोरोना काळात सुरवातीपासूनच मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चांगली कामगिरी बजावली. त्याचे कौतुक खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी आज मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट देऊन शासकीय आरोग्य योजनांचा आढावा घेतला.
पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांनी आज मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला सदिच्छा भेट देऊन महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांचा आढावा घेतला. मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक अजितसिह पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी लंके यांनी हॉस्पिटलच्या स्टाफ सोबत मार्गदर्शनपर चर्चा केली. लंके यांनी मोरया हॉस्पिटल मध्ये राबवल्या जाणाऱ्या योजनांचे कौतुक करत हॉस्पिटलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. अजितसिह पाटील यांनी मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य उपाययोजनांची माहिती दिली. तसेच मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध वैद्यकीय सुविधांबाबतचे सादरीकरणही करण्यात आले.