मानसी नाईकचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मराठमोळ्या मानसी नाईक सातत्याने काही ना काही फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने अनेकदा रिल्सदेखील केले आहेत. ती उत्तम नृत्यांगनाही आहे. तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना आवडतो. प्रत्येक फोटोत आणि व्हिडिओत तिचा हटके अंदाज असतो. आता तिने नवे साडीतील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
वेस्टर्न असो किंवा ट्रेडिशनल तिचा प्रत्येक अंदाज खास असतो. आपले हटके फोटोशूट करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. आता तिने काही फोटो शेअर केले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उतरून तिने फोटोशूट केले आहेत. मस्त अंदाजात तिने स्काय ब्ल्यू कलरच्या साडीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.