गणपती विसर्जन मिरवणूकीच्या मार्गाचा तोडगा निघेपर्यंत लकडी पूलावरील मेट्रोचे काम स्थगित - आबा बागूल

 

गणपती विसर्जन मिरवणूकीच्या मार्गाचा तोडगा निघेपर्यंत लकडी पूलावरील मेट्रोचे काम स्थगित - आबा बागूल
पुणे: पुणे शहरात मेट्रोचे काम प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पूलाचे काम चालू सदर पूल सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीस अडथळा ठरणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांच्यासह पुणे शहरातील अनेक गणेशभक्त महापालिकेच्या मुख्य भवनातील हिरवळीवर जमले होते, तदनंतर गणेशभक्तांनी गणपती बाप्पांची प्रतिकृती घेवून पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या बाहेर घोषणा देवून मागणी केली. यावेळी मा.महापौर यांस निवेदन देण्यात आले. 


यावेळी आबा बागूल म्हणाले की, गणपती मंडळाच्या कार्यकत्र्यांच्या भावना लक्षात घेता घाईघाईत मेट्रोचे काम करणेचा अटटहास करू नका, याविषयी आम्ही तोडगा काढणेसाठी बैठक घ्या अशी मागणी केलेली आहे, त्यानुसार मा.महापौरांनी मेट्रोचे प्रमुख यांचेशी चर्चा केलेली आहे. याविषयी तोडगा निघेपर्यंत लकडी पूलावरील मेट्रोच्या पूलाचे काम थांबविले जाईल असे मा.महापौरांनी आश्वासित केले आहे. तसेच सर्व पक्षाचे प्रतिनिधी, गणेश मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते, मेट्रोचे अधिका
री यांची बैठक बोलाविली जाईल असेही मा.महापौरांनी  आश्वासित केलेले आहे असे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल  यांनी यावेळी सांगितले. 


मा.मुख्य सभेत सदर प्रकरणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल  यांनी मुददा उपस्थित केला असता याविषयी तोडगा निघेपर्यंत लकडी पूलावरील मेट्रोच्या पूलाचे काम थांबविले जाईल असे मा.महापौरांनी आश्वासित केले आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल, नगरसेवक रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक संजय बालगुडे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी स्वीकृत सदस्य अभिजित बारवकर, संजय मते, आनंद सागरे, सुनिल पंडित, विक्रम खन्ना, परेश खांडके, संकेत मते व गणेश मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.