पुणे: पुण्यात अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी शहरातील तसेच पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि ऑफीस बंद असणार आहे. राज्यावर कोरोनाचे संकट असून यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. मात्र, तरीही पुण्याच्या मध्यवर्ती भागात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे गणेश विसर्जनादिवशी काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गणपती विसर्जनाच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट-हॉटेल सुरू राहणार आहेत. मात्र, इतर सर्व दुकानं रविवारी पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, रस्ते, पदपथांवर मूर्ती विक्री स्टॉल लावू नयेत, तसेच प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना यंदाही परवानगी देण्यात येणार नाही.
गणपती विसर्जनाच्या दिवशी रविवारी (ता. १९) पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि कॅन्टोनमेंट क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सुरू राहतील. तसेच, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, परिस्थिती आटोक्यात आल्यास येत्या दोन ऑक्टोबरला बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात शुक्रवारी कोरोना उपाययोजना संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त राजेश पाटील या वेळी उपस्थित होते.