बस स्टॉप वर पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणाऱ्याला दहा हजार रुपयांचा दंड

बस स्टॉप वर पत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणाऱ्याला दहा हजार रुपयांचा दंड




सिंहगड टाईम्सच्या व्हाट्स अ‍ॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 

 धायरी: धायरी येथील पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत येणाऱ्या बस स्टॉप वरती पोलीस भरतीच्या क्लासच्या जाहिरातीचे नवीन बॅच सुरु करण्याच्या जाहिरातींचे भिंतीपत्रके चिटकवून विद्रुपीकरण करणा-यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलीस भरती क्लास चालवणाऱ्या गुरुजी अकादमी कडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यासाठी महेश पोकळे यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या परिहवाहन मंडळाच्या बसटॉप चे आणि सार्वजनिक ठिकाणचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी जागोजागी क्लास, नोकरभरती, आयुर्वेद दवाखाने आदींच्या जाहिराती करून परिसराचे विद्रुपीकरात वारंवार होत असते. सार्वजानिक ठिकाणी सिंहगड रोड आणि धायरी परिसरात जाहिराती चिटकवून विद्रूपी कारण करणाऱ्या सिंहगड कॉलेज रॉड भागातील गुरुजी अकादमी वर पुणे महापालिकेने कारवाई केली आहे. कलम २४४ आणि ३७६ अंतर्गत शहर स्वच्छता व नियोजन कायद्याअंतर्गत अस्वच्छता आणि उपद्रव निर्माण केलेली असल्याने १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुणे महानगर पालिकेच्या ही कारवाई सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय मार्फत केली आहे. 


या प्रकरणी शिवसेनेचे खडकवासला मतदार संघाचे विभाग प्रमुख महेश पोकळे यांनी बस स्टॉप वरती अशाप्रकारे पोस्टर लावून विद्रुपीकरण करणाऱ्या कंपनीवर पी एम पी एल प्रशासन तर्फे गुन्हा दाखल करावा व कडक कारवाई करावी जेणेकरून परत अशी कोणती कंपनी बस स्टॉपचे विद्रुपीकरण करणार नाही. अशी मागणी सोशल मीडिया द्वारे केली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.