पुणे: पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अजय खेडेकर यांच्यातर्फे तृतीयपंथीय समाजातील व्यक्तींसाठी ई- श्रमिक कार्ड याची नोंदणी करून घेण्यात आली. या वेळी मंगलमुखी किन्नर संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षा आशिका पुणेकर, पुणे शहर अध्यक्षा मयुरी बनसोड, रमोला दीदी, मोनिका पुणेकर, आशु पांडव, मन्नत शेख या सर्व तृतीयपंथी मान्यवर उपस्थित होते. तृतीयपंथी समाजाच्या हक्कासाठीया संघटना कार्यरत आहेत.
तृतीयपंथी समाज हा सध्या वंचित असून त्यासाठी या सर्व संघटना काम करत आहेत. अजय खेडेकर यांनी आगामी काळात मोठ्या प्रमाणात कार्ड वाटप केले जाईल यावेळी आश्वासन दिले. संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या कार्यक्रमात मंगलमुखी किन्नर देवदास देवदासी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते.