उमेश कारले यांच्या पाठपुराव्याला यश, धोकादायक पारंब्यात अडकलेल्या जीर्ण फांद्या हटवल्या

 

नांदेड: पुण्यनगरीचा भाग असलेल्या ऐतिहासिक सिंहगड रस्त्यावर नांदेडफाटा अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. अवजड वाहनांमुळे या भागात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. रस्त्याची दुर्दशा झालेली असून वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच  नांदेड फाट्यावर असलेल्या वडाच्या जीर्ण फांद्या सतत पडत होत्या. धोकादायक अश्या वडाच्या जीर्ण फांद्या पारंब्याला अडकून होत्या. उमेश कारले यांनी त्या संदर्भात सिहंगड क्षेत्रीय कार्यालयामध्ये निवेदन दिले होते. त्या नंतर त्या धोकादायक जीर्ण फांद्या पालिका प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. 

मागच्या आठवड्यात नांदेड फाट्यावरील स्थानिक नागरिक शिवाजी दरवाडकर हे रस्त्याने जात असताना अशीच जीर्ण झालेली फांदी त्यांच्या शेजारीच झाडावरवरून पडली. या मध्ये ते थोडक्यात बचावले होते. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.