पुणे: विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाकडून आज ठिकठिकाणी धरणं आंदोलन करण्यात आले. राज्य मागासवर्ग आयोगावर मराठा विरोधी सदस्य असल्याचा आरोप करीत हा आयोग तातडीने बरखास्त करावा. तसेच अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करावी, अश्या विविध मागण्यांसाठी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठा आरक्षणा बाबत जे विषय महाविकास आघाडी सरकारच्या हातात आहेत त्याकडे मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष चव्हाण हे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी मराठा समाजाची निराशा केली आहे. त्यामुळे चव्हाण यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. राज्य सरकारने ओबीसींप्रमाणे मराठा समाजालाही सर्व सवलती लागू कराव्यात, राज्य मागासवर्ग आयोगावर सर्व मराठा विरोधी सदस्यांचा भरणा असून, हा आयोग तातडीने बरखास्त करावा. अश्या अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
"मराठा आरक्षण हा विषय गंभीर असून सुद्धा महाविकास आघाड़ी सरकार या विषयाकडे दुर्लक्ष्य करत आहे. मराठा समाजाच्या जीवनाशी यांनी खेळ चालवला आहे मागील ५ वर्ष हे भाजपा चे सरकार असताना आरक्षण हे शेवट च्या टप्यात होते पण या सरकार च्या नाकर्तेपणा मुळे ते पुन्हा मागे गेले आहे. केंद्रात मोदी सरकार हे ७ वर्ष झाले काम करत आहे पण ही काही वर्ष जर सोडली तर १५ वर्ष राज्यात आघाड़ी सरकार होते आणि केंद्रात ही आघाड़ी सरकार असताना हे आरक्षणाबाबत निर्णय घेऊ शकले नाही. आज तेच सरकार म्हणत आहे ५०%मर्यादा वाढवली पाहिजे केंद्राने मग तुमचे सरकार असताना ही अक्कल कुठे गेली होती?, हा सवाल आज मराठा समाज करत आहे. मराठा समाज यांना त्यांची जागा दाखवेल हे मात्र नक्की आहे. मराठा आरक्षणाचा लढा मेटे साहेबांनी अनेक वर्षांपासून लावून धरला आहे. २०१६ साली कोपर्डी प्रकरणात आमच्या भगिनींवर अन्याय झाला त्यावेळी प्रकाराणानंतर मराठा समाज खरा रस्त्यावर आला आणि मोठीमोठी आंदोलने आणि मोर्चे झाले पण त्या अगोदरपासून आजपर्यंत मराठा आरक्षणाचा लढा जिवंत ठेवण्याचे काम विनायक मेटे यांनीच केले" भरत लगड- शहराध्यक्ष, शिवसंग्राम पुणे
या धरणे आंदोलनात शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता घुले, महिला शहराध्यक्षा कालिंदी गोडांबे, युवक शहराध्यक्ष नितीन ननावरे, समीर निकम, कल्याण अडागळे, विनोद शिंदे, किशोर मुळूक, बाळासाहेब चव्हाण, निशा गायकवाड, सुरेश थोरात, अभिजित म्हसवडे, भरत फाटक, अमित शिंदे, सागर फाटक, सुजाता ढमाले, दिलीप पेठकर, लहू ओहोळ, केशव बालवडकर, चेतन भालेकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.