पुणे: द रॉयल यांच्या सौजन्याने घेण्यात आलेला भव्य-दिव्य मॉडेलिंग शो द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र २०२१ फॅशन शोचा महाअंतिम सोहळा पुण्यातील J2K क्लब मध्ये मोठ्या उत्सहात संपन्न झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या निर्बंधामुळे तब्बल २० महिन्यानंतर पुणे मध्ये भरविण्यात आला. अशी माहिती द रॉयल चे संचालक नितीन झगरे यांनी पत्रकारांना दिली. मिसेस इंडिया २०२१च्या विजेत्यांना या मध्ये गौरवण्यात आले. कोल्हापुरच्या तिलोत्तमा देशमुख यांनी मिसेस इंडियाचा किताब जिंकत इतिहास रचला होता. मराठी फिल्म इंडस्ट्री मधील दिग्गज व्यक्ती देवमाणूस फेम डॉ. शशिकांत डोईफोडे यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या 'ओ शेठ तुम्ही नाद केला थेट' या मराठी गाण्याची टिम उपस्थित होती.
सर्वानाच उस्तुकता लागून असलेल्या द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र २०२१ फॅशन शोची महाअंतिम फेरीचा भव्य दिव्य असा सोहळा पुण्यात पार पडला. मिस्टर, मिस आणि मिसेस अश्या तीन गटांच्या स्पर्धकांच्या मध्ये महाअंतिम फेरीचा निकाल लागलेल्या स्पर्धकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.पुण्याचे यशस्वी उद्योजक मन्नत कोल्हापूरी मळा चे डायरेक्टर पंकज सारसार यांनी प्रायोजित केला.
यावेळी नामांकित अश्या ब्रँड अम्बेसिडर मॉडेलेंसचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड ऐश्वर्या कुंटे, ब्रँड अम्बेसिडर ठाणे प्राची जितेन्द्र, ब्रँड अम्बेसिडर बंगलोर निशा शिंदे, ब्रँड अम्बेसिडर दिल्ली सरोज गजभिये, ब्रँड अम्बेसिडर मुंबई अनघा गावडे, ब्रँड अम्बेसिडर कोल्हापुर स्नेहल सरगर, ब्रँड अम्बेसिडर मुंबई रोशनी कदम, ब्रँड अम्बेसिडर सोलापुर सीमा रजपूत, ब्रँड अम्बेसिडर पुणे सुरेखा भोसले, ब्रँड अम्बेसिडर नाशिक तृप्ती ढवन, रॉयल किड्सच्या ब्रँड अम्बेसिडर तनुश्री निर्मल, ब्रँड अम्बेसिडर रॉयल किड्स पुणे अरोही ढमढेरे, सौंदर्यवती मी महाराष्ट्राची जयश्री धोंगडे यांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉयल च्या ब्रँड अम्बेसिडर रेणुका ठाणगे आणि रॉयल किड्स ब्रँड अम्बेसिडर युवाक्षी पाटील मुख्य आकर्षण होत्या. तसेच वृत्तपत्रातून सर्व सामान्य ना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र आदर्श पत्रकार म्हणुन सुनिल भोसलेंचा सन्मान करण्यात आला. द रॉयल चे संचालक नितीन झगरे यांनी त्यांचा सन्मान केला.
द रॉयल किंग & क्वीन महाराष्ट्र २०२१ फॅशन शो मधील विजयी स्पर्धकांना फिल्म, सॉंग मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी तसेच फॅशन इंडस्ट्रीज मधील कामाच्या संधी उपलब्ध करून देण्यार असल्याचे आयोजक नितीन झगरे यांनी सांगितले.
संपुर्ण मेकअप आणि हेअरस्टाईल मंजू मंजुळकर यांनी केले. डिझाईनर शर्वीन जाधव यांनी अतिशय मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची प्राजक्ता जोगलेकर आणि कोमल ढवळे यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली. फोटोग्राफी ची संपुर्ण जबाबदारी तेजस नाईकवाडी यांनी पार पाडली. तेजस आणि त्यांची टी.एन फोटोग्राफी संपुर्ण टीम प्रत्येक शो शो यशस्वी होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. रॉयल शो ची संपुर्ण ग्रूमिंग मिसेस युनिव्हर्स पायल प्रमानिक आणि आकाश खेडकर यांनी केले. शो ची ब्रँडिंग ची जबाबदारी संदीप वाबळे, ह्रषीकेश शिंदे आणि सुरेश थोरात यांनी पार पाडली.
या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उपाध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव भोसले, मिसेस युनिव्हर्स प्रचिती पुंडे, मिसेस महाराष्ट्र स्नेहल जितूरी, मिसेस इंडिया पल्लवी मोरे-माने, सोमनाथ होळकर, अक्षय जगताप, सुदर्शन बनसोडे, मिसेस महाराष्ट्र स्नेहल जितूरी, साईप्रसाद ,मार्गदर्शक मयुरेश अभ्यंकर, शो चा या शो साठी सागर पतंगे, सागर लोखंडे, वास्तुतन्य नमिता ताई पाटील, आकाश रणदिवे,तेजस नाईकवाडी, व्यंकटेश कदम, श्रीदेवी निर्मल, कोमल नांदे, रश्मी भटनागर, वैशाली दळवी, सुमैय्या पठाण, शितल रासकर, बाऊंसर ग्रुप दिपाली परब ज्योतिबा ऊबाळे, उद्योजक मन्सुख रासकर, के.के.एस किचनचे किरण शिंदे, अश्या सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.