पुणे: यंदाचा पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव जमावबंदीच्या सावटाखाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कलमी १४४ लागू करण्यात आहे. पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांसह सर्व सार्वजनिक मंडळांच्या वतीने यंदाही उत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. मानाच्या पाच गणपतींसह प्रमुख गणेश मंडळांच्या गणेशाची प्राणप्रतिष्ठापना शुक्रवारी दि. १० सप्टेंबर, दुपापर्यंत होणार आहे. प्रतिष्ठापनेआधी मिरवणूक निघणार नसली, तरी या गणपतींचे दर्शन ऑनलाइन माध्यमातून घेण्याची सोया मंडळामार्फत करण्यात येणार आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम यांच्या फेसबुक पेजवर, तर तुळशीबाग मंडळाच्या यूटय़ूब पेजवर प्रतिष्ठापनेचा सोहळा आणि ‘श्रीं’च्या दर्शनाची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
कसबा गणपती
कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांच्या मुहूर्तावर खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. त्याआधी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे ‘श्रीं’ची मूर्ती पालखीतून उत्सव मांडवात आणण्यात येईल.
तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी साडेअकरा वाजता वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सनई चौघडय़ांच्या सुरावटीत होणार आहे.
गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता के ली जाणार आहे. उत्सवमूर्तीचे हे सुवर्णमहोत्सवी (५० वे ) वर्ष आहे.
तुळशीबाग मंडळ
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. चिंतामणी जोशी पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधी या वेळी होणार आहेत.
केसरी गणेशोत्सव
मानाचा पाचवा के सरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून के सरीवाडय़ात आणली जाईल. ‘के सरी’चे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना होणार आहे. सनई-चौघडय़ाचा मंगलमयी स्वरनाद आणि धार्मिक विधी अशा थाटात श्री विराजमान होणार आहेत.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने सकाळी दहा वाजून २३ मिनिटांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वेदमूर्ती नटराज शास्त्री आणि मिलिंद राहुरकर हे पौरोहित्य करणार आहेत. प्राणप्रतिष्ठापना सोहळा, ‘श्रीं’चे दर्शन आणि ऋषिपंचमीनिमित्त होणारा अथर्वशीर्ष पठण सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहता येईल.
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची प्रतिष्ठापना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि मीना भोंडवे यांच्या हस्ते दुपारी बारा वाजता मंदिरातच होणार आहे. परंपरेनुसार सनई-चौघडा वादन होणार आहे. अविनाश कु लकर्णी गुरुजी पौरोहित्य करणार आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता होणार आहे.