नांदेड: नांदेड फाट्या परिसरात इंडस्ट्रिअल एरिया असल्याने आणि झपाट्याने या भागाचा विकास होत असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. सिंहगड आणि खडकवासला येथे भेट देण्यासाठी पर्यटकांचीही नेहमी या रस्त्याला वर्दळ असते. नांदेड फाट्यावरील रस्ता अरुंद असल्याने वाहतूक होऊन नोकरदार कामगार वर्ग यांना याचा नाहक त्रास भोगावा लागत आहे. त्यामुळे नांदेड फाट्यावर वाहतूक कोंडी नित्याची बाब असते. उमेश कारले यांनी
"नांदेड फाट्यावरील रस्त्याची रुंदी कमी आहे. खडकवासला कडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ जास्त आहे. त्यात रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत त्यामुळे रोज इथे वाहतूक कोंडी पाहायला मिळते, गेल्या आठवड्यात आगीची दुर्घटना झाली असता अग्निशक दलाच्या गाड्या व अम्ब्युलन्स येण्यासाठी उशीर लागला होता. त्यामुळे नांदेड फाटा चौकात वाहतूक नियंत्रित होण्यासाठी सिंग्नल बसवावा तसेच तात्पुरती का होईना पण रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी हवेली पोलीस स्टेशन कडे निवेदन देणार आहे." उमेश कारले, पुणे शहराध्यक्ष - पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य
या चौकात मोठाले खड्डे पडल्याने खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघातांना सोमोरे जावे लागत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन तात्काळ खड्डे बुजवून तात्पुरती तरी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका दुचाकीस्वाराचा खड्डे चुकविताना अपघात झाला. सुदैवाने वाहनावर नियंत्रण मिळविल्याने किरकोळ दुखापत झाली. दररोज अपघाताच्या घटना घडत असताना खड्डे दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. भर चौकात ड्रेनेज उघड्यावर पडले आहे, एखादी गाडी त्याच्यावरून गेली तर मोठा अपघात होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर याची दाखल घ्यावी.
एकतर रस्त्याची रुंदी कमी असताना मध्येच लोखंडी रस्ते दुभाजक ठेवले असून त्यांचा वाहतुकीस अडथळा होत असताना दिसत आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहतुकीस अडथळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात.थळा हाेताे, शिवाय वाहतूक काेंडीमुळे नेहमीच अपघाताच्या घटना घडतात.