डोणजे: पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सभापती पूजाताई पारगे यांच्या निधीतून संपूर्ण किल्ले सिंहगड खोऱ्यातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महिला, बालकल्याण समिती सभापती पुजाताई पारगे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेली शाळा दुरुस्ती व नवीन वर्ग खोली कामे मंजूर झाली आहेत. या निधीतून आंबी येथील शाळेच्या २ नवीन वर्गाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम महिला बालकल्याण सभापती पुजाताई पारगे यांच्या हस्ते आज पार पडला.
मांगडेवाडी - डोणजे गटातील आंबी उभा गावी जिल्हा परिषद सदस्य तथा महिला बालकल्याण सभापती पुजाताई नवनाथ पारगे यांच्या निधीतून जि. प. शाळेच्या विकास कामास सुरवात झाली. आंबी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती व नवीन २ वर्ग खोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन पुजाताई पारगे यांच्या शुभहस्ते झाले. भूमिपूजन समारंभातून शाळेच्या विकास कामाचा श्रीगणेशा झाला असून, लवकरच ही कामे पूर्णत्वास जाणार असल्याचे अभिवचन यावेळी पारगे यांनी दिले.
पुणे जिल्हा परिषद सेस अनुदानातुन शाळेच्या बांधकामासाठी अनुदान मंजूर करणेत येते. या अनुदानातुन शाळा / वर्गखोली दुरुस्ती, शाळांना कंपाऊंड वॉल बांधणे ही कामे मंजूर केली जातात. या वर्षी खासदार सुप्रिया सुळे व महिला, बालकल्याण समिती सभापती पुजाताई नवनाथ पारगे यांच्या प्रयत्नाने भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती तसेच नवीन वर्ग खोल्यांचे काम केले जाणार आहे. या मध्ये अहिरे भोकरेवाडी, सांगरून, बहुली, कुडजे, खामगाव मावळ, डोणजे, गाउडदरा, गोर्हे खुर्द, रहाटवडे, कल्याण, श्रीरामनगर, आंबी आदी जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती केली जाणार आहे.
यावेळी मा. जि. प उपाध्यक्ष शुक्राभाऊ वांजळे, राष्ट्रवादी ख. अध्यक्ष त्रिंबकआण्णा मोकाशी, मा. जि. प. सदस्य नवनाथ पारगे, कॉग्रसचे वैशाली खाटपे, अतुल कारले, स्थानिक सरपंच मंगल लहुआण्णा निवगुणे, सदस्य शंकरनाना निवगुणे, भूषण निवगुणे, संतोष वर्पे, ग्रामसेवक रवींद्र सोनवणे साहेब,राजू निवगुणे, नवनाथ चोंधे, लहुआण्णा निवगुणे, माणिकआण्णा निवगुणे, सुरेश निवगुणे, रामभाऊ मस्कर, अनंता निवगुणे, गणेश निवगुणे, बाबुराव मस्कर, विकास चोंधे, सर्जेआबा निवगुणे, अवधूत मते, सचिन पायगुडे,व आंबी गावातील स्थानिक नागरिक उपस्थित होते