१२ वी पाठोपाठ १० वीच्याही गुणवंत मुलींच्या बँक खात्यात जिल्हा परिषद जमा करणार रक्कम

 

पुणे: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीनींना प्रोत्साहन देण्यासाठी मागच्या वर्षी पुणे जिल्हा परिषदेने मोठा निर्णय घेतला होता. इयत्ता १२ वीच्या गुणवंत मुलींसाठी ही बक्षीस योजना सुरू केली होती. १२वी मध्ये ज्या मुलींना ८० टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या मुलींना बक्षीस म्हणून ५०००/ रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा केले जातात. या वर्षी पासून या योजनेमध्ये बदल करून आता इयत्ता १० विच्याही मुलींचा या मध्ये समावेश केला आहे. यानुसार १० वीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना असून यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. 


ग्रामीण भागातील मुलींना आर्थिक अडचणीमुळे वंचित राहावे लागते.त्यामुळे या योजनेमध्ये दहावीच्या वर्गातील मुलींचा समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून त्यामुळे यंदाच्या वर्षापासून दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. 


 ग्रामीण भागामधील मुली शिक्षणापासून का वंचित राहतात यासाठी "माझं शिक्षण माझा अधिकार" या अंतर्गत महिला दक्षता समिती मार्फत आम्ही सर्व्हे केला होता. त्यामध्ये असे आढळून आले की, शाळेमध्ये जाण्या-येण्यासाठी मुलींना आर्थिक अडचणींनींना सामोरे जाव लागत आहे. त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यासाठी तसेच मुलींनी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ही योजना चालू केली आहे. या योजनेची अमलबजावणी सुरु झाली असून गुणवंत विद्यार्थिनींची नावे, पत्ता, वर्ग, परीक्षेत मिळालेले गुण आणि त्यांची बँक खात्याची माहिती जमा झाली की लवकरच त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. पूजा पारगे- सभापती, महिला व बालकल्याण, पुणे जिल्हा परिषद  



गेल्या वर्षी केवळ बारावीच्या वर्गातील मुलींपुरतीच ही योजना मर्यादित होती. मात्र चालू शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता दहावी मध्ये ज्या मुलांना ८० टक्क्या पेक्षा जास्त गुण प्राविण्य मिळाले आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी विद्यार्थीनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बॅंक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे.


गेल्या आर्थिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेने या योजनेसाठी १५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र यमाधिक फक्त ७ लाख रुपये नीच या योजनेवर खर्च झाला होता. गेल्या वर्षी फक्त १४० मुलींनाच याचा लाभ मिळाला होता. या वर्षी या निधीमध्ये १० लाख रुपयांची भरीव वाढ करून तो निधी २५ लाख रुपये करण्यात आला आहे. 

Sinhagad Times



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.