पुणे: गेल्याच आठवड्यामध्ये पुण्यासह महाराष्ट्रात भाजपने मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलने केली. त्यानंतर भजनी जवळीक साधलेल्या मनसेही मंदिरे खुली करण्यासाठी आक्रमक झाली आहे. मंदीर दर्शनासाठी खुली झाली पाहिजेत अश्या घोषणा करत पुण्यात तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकत्यांनी आंदोलन केले. महिला कार्यकत्यांच्या हस्ते या वेळी जोगेश्वरी मातेची पूजाही करण्यात आली. या वेळी मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेट दिला आहे.
‘जनआशीर्वाद यात्रा, मेळावे, परस्परांविरोधात आंदोलने होत आहेत. परंतू, सण आला की करोनाचे कारण देत निर्बंध कठोर केले जातात. ‘लॉकडाऊन आवडे सर्वाना’ अशी राज्य सरकारची परिस्थिती आहे,’ अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे सरकारला लक्ष्य केले. ‘नियम सर्वाना सारखे असले पाहिजे. एकाला एक नियम तर दुसऱ्याला दुसरा, हे बरोबर नाही. शिवसेना विरोधात असती तर त्यांनी काय केले असते, असा सवाल ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला होता.
गेल्या दीड वर्षांपासून मंदिरे व देवस्थाने करोना महामारीच्या निर्बंधामुळे बंद आहेत. दुकाने उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पुढील आठ दिवसात मंदिरं उघडली नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही. व स्वतः जाऊन मंदिरं उघडणार असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला आहे.