महिला व बालकल्याण समिती सभापती पूजाताई पारगे यांच्या निधीतून खानापूर येथे विकास कामांचे भूमिपूजन

 

पूजा पारगे यांच्या हस्ते खानापूर येथे विकास कामांचे भूमिपूजन

खानापूर: पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा महिला व बालकल्याण समिती सभापती पूजाताई पारगे यांच्या निधीतून संपूर्ण किल्ले सिंहगड खोऱ्यातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच अनुषंगाने आज खानापूर गावांत भोई आळीतील रस्त्याच्या कॉंक्रेटीकरण व घन कचरा प्रकल्पाच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. 


पुजाताई पारगे व मा. जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या शुभहस्ते झालेल्या भूमिपूजन समारंभातून या कामांचा श्रीगणेशा झाला असून, लवकरच ही कामे पूर्णत्वास जाणार असल्याचे अभिवचन यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती पूजा पारगे यांनी दिले. 


आज पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सौ. पुजाताई पारगे व नवनाथदादा पारगे यांच्यासह नारायणशेठ जावळकर मा. सरपंच खानापूर, संजय जावळकर मा. पंचायत समिती सदस्य, मुरलीधर जावळकर मा. उपसरपंच खानापूर, वैशाली बाळासाहेब जावळकर मा.सरपंच, शांताबाई जावळकर मा.उपसरपंच, लालाशेठ जावळकर मा. सरपंच, सा. कार्यकर्ते माऊली जावळकर, केतन जावळकर,  ग्रामसेवक सौ.वंदना गायकवाड, निकेतन दापटे (प्रशासक) व खानापूर ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.