उंड्री गावाच्या पहिल्या महिला सरपंचाचं निधन, आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा

उंड्री गावाच्या पहिल्या महिला सरपंचाचं निधन, आईच्या पार्थिवाला लेकींनी दिला खांदा

कात्रज: उंड्री येथील प्रसिद्ध महिला उद्योजक, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती, शारदा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा तसेच उंड्री गावच्या प्रथम महिला सरपंच शारदा मोहनराव होले यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.  मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो. मात्र उंड्री इथे पहिल्या महिला सरपंच शारदा मोहनराव होले यांच्या पार्थिवाला मुलींनी खांदा देऊन आदर्श घालून दिला.


वंशाचा दिवा मुलगाच हा समज दूर करत या दोन मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देत सर्व विधी पार पाडले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या दोन लेकींनी भासू दिली नाही. त्यांनी आपल्या परिवाराप्रामणे नागरिकांची सेवा केली आहे. आज त्यांचे नाव उंड्री परिसरात अभिमानाने घेतले जाते. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्याला मोठे दु:ख झाल्याचे राजेंद्र भिंताडे यांनी सांगितले.


या दु:खद प्रसंगी हजारो ग्रामस्थांनी तसेच समाजातील राजकीय नेते, व्यावसायिक,उद्योजक आणि इतर नागरिकांनी अनुभवला. शारदा होले यांच्या पश्चात पती, दोन मुली,जावई, दीर, जावा, पुतणे, नातू , आदी मोठा परिवार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.