रंगीबेरंगी फुलांची उधळण करीत कास पठारावर फुले बहरू लागली



पुणे: कास पठार रंगीबेरंगी फुलांनी बहरू लागले असून पठारासह डोंगररांगा हिरवळल्या आहेत. पंधरवड्यानंतर पठारावरील फुलोत्सवाला बहर येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे या पठारावर पर्यटकांची पावले पडलीच नाहीत. संपूर्ण हंगामात कासवर पर्यटकांना बंदी होती. दुर्मीळ जातीच्या रानफुलांनी बहरणारे कासचे पठार बघण्यासाठीची पर्यटक, अभ्यासकांची प्रतीक्षा आता संपली आहे. २५ ऑगस्ट पासून वन विभागाने येथे भेट देण्याकरिता नावनोंदणी सुरू केली आहे.  

Kas Pathar


गेल्या वर्षी पावसामुळे हंगाम पूर्णपणे बहरलेला होता. मात्र करोना महामारीमुळे कास पठार पर्यटकांसाठी बंद होते  राहिली होती. 2018 च्या तुलनेत 2019 च्या हंगामात पर्यटकांची संख्या कमी राहिली होती. त्यामुळे यंदा हे पठार दोन वर्षांची पर्यटकांची फुलोत्सवाची आस पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. ‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’ असं हे देखणं रूप सध्या पाहायला मिळत असून हिरव्यागार मखमली गालिच्याचा रंग आठ-पंधरा दिवसांनी बदलताना दिसत असला तरी सध्या रंगीबेरंगी फुले तुरळकच दिसत आहेत. पांढरा शुभ्र, लाल, निळा, जांभळा, पिवळा, अबोली अशा कितीतरी रंगांच्या छटांचे हे पुष्पवैभव सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात डोळ्यांचे पारणे फेडणार आहे.

Kas Pathar,


सध्या कास पठारावर स्पंद तेरडा, चवर, डीपकांडी, टूथब्रश, आभाळी, निलिमा, अबोलिमा, नभाळी, पिवळी सोनकी, गुलाबी तेरडा, रानहळद पांढरी, पिवळी, लाल, तपकिरी, कापरू, सीतेची आसवं, गेंध (धनगर गवत) रानमोहरी, रानवागं, वाई तुरा, अशी 130 ते 140 प्रकारची फुले दिसू लागली आहेत. त्यामुळे पठारावर विविध फुलांच्या रंगीबेरंगी छटा पाहावयास मिळत आहेत. सध्या कास पठारावर तेरडा, गुलाबी, पिवळ्या व पांढर्‍या रंगांची फुले पर्यटकांची आकर्षण ठरू लागली आहेत.

Kas Pathar,


या पुष्प पठारावर क्षणात सूर्यकिरणांतील इंद्रधनुषी छटा तर क्षणात बोचरा वारा, क्षणार्धात दाट धुके, रिमझिम पावसाच्या सरी अशा वातावरणातील बदलांचाही हवाहवासा क्षण प्रत्येकालाच मोहात टाकणारा असतो. गर्द धुके, हिरव्यागार विविध रंगांच्या वनस्पतीमुळे आणि नयनरम्य फुलांमुळे कास पुष्प पठार परिसर जणू धरतीवरचा स्वर्ग असल्याचा भास येथे येणार्‍या प्रत्येकालाच होतो. हा नजराणा गेल्यावर्षी कोरोनामुळे पर्यटकांसाठी उलगडलाच नाही. संपूर्ण हंगाम काळात या पठारावर पर्यटकांना बंदी होती. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना येथे येता आले नाही. आता मात्र कोरोनाचा जोर ओसरला असून पर्यटन खुलले आहे. त्यामुळे हे पठार पर्यटकांसाठी बुधवार, २५ ऑगस्ट पासून खुले झाले आहे. सध्या पठारावर तुरळक स्वरूपात फुले आली असून सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात गालिचा फुलणार


Kas Pathar,


तीन वर्षांपूर्वी कास पठाराला भेट देणाऱ्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेल्याने इथली जैवविविधता धोक्यात आली होती. सुट्टीच्या दिवशी पठारावर ५० ते ६० हजार पर्यटक हजेरी लावत होते. त्यामुळे वन विभागाने पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. या वर्षीदेखील सुट्टीच्या दिवशी वेगवेगळ्या तीन वेळांमध्ये तीन हजार पर्यटकांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांनी आठवड्यातील इतर दिवशी पठारावर यावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. येथे जाण्याआधी ऑनलाइन बुकिंग करणे आवश्यक असून, त्यासाठी https://www.kas.ind.in/ या वेबसाइटला भेट द्यावी, असेही वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.